Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: नवजीवन मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कार्यकारिणी बिनविरोध
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
नवजीवन मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कार्यकारिणी बिनविरोध सतीश कोमरवेल्लीवार अध्यक्षपदी, रामदास गिरटकर सचिवपदी निवड आमचा विदर्भ - अनंता गो...
नवजीवन मंडळाच्या त्रैवार्षिक निवडणुकीत कार्यकारिणी बिनविरोध
सतीश कोमरवेल्लीवार अध्यक्षपदी, रामदास गिरटकर सचिवपदी निवड
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
राजुरा (दि. ०१ जुलै २०२५) –
         नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ, विरूर (स्टे.) रजि. क्र. एफ-२४१३ (चं) या संस्थेची त्रैवार्षिक निवडणूक सहाय्यक धर्मदाय आयुक्त चंद्रपूर यांच्या आदेश क्र. ६४/२०२५ कलम ४१(अ) दिनांक ९ एप्रिल २०२५ नुसार पार पडली. ही निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी अ‍ॅड. खुशाल खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, विरूर (स्टे.) येथे २९ जून २०२५ रोजी पार पडली. संस्थेच्या एकूण दहा सभासदांपैकी सात सभासदांनी निवडणूक प्रक्रियेत भाग घेतला. निवडणूक प्रक्रियेनंतर संपूर्ण कार्यकारिणी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा निवडणूक अधिकारी अ‍ॅड. खोब्रागडे यांनी केली.

        नवीन कार्यकारी मंडळात अध्यक्ष सतीश कोमरवेल्लीवार, सचिव रामदास गिरटकर, उपाध्यक्ष खुशाल कोडापे, सहसचिव हरिदास वानखेडे, कोषाध्यक्ष गुलाबराव ताकसांडे, कार्यकारिणी सदस्य श्रीमती प्रभाताई कोमरवेल्लीवार, श्रीमती खाजाबानो बशीर अहमद यांची निवड झाली. तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व असलेले सतीश कोमरवेल्लीवार हे भारतीय जनता पक्षाचे राजुरा तालुका उपाध्यक्ष असून शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी ओळखले जातात. रामदास गिरटकर हे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, नागपूर विभागाचे संघटनमंत्री म्हणून कार्यरत आहेत. नवीन कार्यकारिणीच्या बिनविरोध निवडीमुळे संस्थेच्या कार्यकाळात स्थैर्य आणि विकासाचे नवे दालन खुले होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top