Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बिबी ग्रामपंचायतीतील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन कौतुकास्पद!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बिबी ग्रामपंचायतीतील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन कौतुकास्पद! आमचा विदर्भ - कोरपना (दि. ०४ जुलै २०२५) - हागणदारी मुक्त अधिक उत्कृष्ट ग्रामपंचा...
बिबी ग्रामपंचायतीतील स्वच्छता व कचरा व्यवस्थापन कौतुकास्पद!
आमचा विदर्भ -
कोरपना (दि. ०४ जुलै २०२५) -
हागणदारी मुक्त अधिक उत्कृष्ट ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत बिबी ग्रामपंचायतीची अंतर तालुका तपासणी करण्यात आली. पंचायत समिती बल्लारपूर व कोरपना येथून आलेल्या अधिकाऱ्यांच्या पथकाने प्रत्यक्ष ग्रामपंचायतीत जाऊन स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनासह विविध बाबींची बारकाईने पाहणी केली.

तपासणी पथकात गटविकास अधिकारी धनंजय साळवे, विस्तार अधिकारी दिलीप बैलनवार, गट समन्वयक सुनील नुतलवार (बल्लारपूर), गटविकास अधिकारी विजय पेंदाम, विस्तार अधिकारी पंढरीनाथ गेडाम, विस्तार अधिकारी दादाराव पवार, गट समन्वयक लॉरेन्स खोब्रागडे तसेच सांडपाणी व घनकचरा सल्लागार विठ्ठल अहिरकर यांचा समावेश होता.

या पथकाने शोष खड्डे, नाडेप कंपोस्ट युनिट्स, खत खड्डे, कचराकुंड्या, सार्वजनिक स्वच्छता संकुल, तसेच ओला-सुका कचरा वर्गीकरण व अपशिष्ट व्यवस्थापन यांची सखोल पाहणी केली. कामे नियोजनबद्ध, गुणवत्तापूर्ण व स्थानिक सहभागातून यशस्वीपणे पार पाडण्यात आल्याचे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदवले.

तपासणीदरम्यान ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग, महिलांचे योगदान, युवकांची पुढाकाराने केलेली मदत, तसेच स्वच्छतेबाबतची जनजागृती ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली. यावेळी सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, सुनील कुरसंगे, तसेच अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिकार्‍यांनी स्वच्छतेसंदर्भातील उपक्रमांची नियमित देखरेख, ग्रामस्तरावर अधिक जनजागृती आणि सहभाग वाढविण्याच्या सूचना दिल्या. बिबी ग्रामपंचायत हागणदारीमुक्त अधिक उत्कृष्ट ग्रामपंचायत या उपक्रमांतर्गत इतर गावांसाठी आदर्श ठरत असल्याचे निरीक्षण या पाहणीतून समोर आले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top