Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "अस्पृश्य वेदनांना स्पर्श करणारे हात म्हणजे डॉक्टर"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"अस्पृश्य वेदनांना स्पर्श करणारे हात म्हणजे डॉक्टर" निःस्वार्थ सेवेचा दिवस – १ जुलै डॉक्टर्स डे आमचा विदर्भ -  चंद्रपूर (दि. ३० जू...
"अस्पृश्य वेदनांना स्पर्श करणारे हात म्हणजे डॉक्टर"
निःस्वार्थ सेवेचा दिवस – १ जुलै डॉक्टर्स डे
आमचा विदर्भ - 
चंद्रपूर (दि. ३० जून २०२५)
        “देव सर्वत्र पोहोचू शकत नाही, म्हणून त्याने डॉक्टर निर्माण केले” ही ओळ प्रत्यक्षात उतरवणाऱ्या प्रत्येक डॉक्टरासाठी १ जुलै हा दिवस विशेष आहे. राष्ट्रीय डॉक्टर्स डे संपूर्ण भारतभर सन्मानाने साजरा केला जातो. या निमित्ताने वैद्यकीय सेवेतील अष्टपैलू योगदान देणाऱ्या डॉ. बिधान चंद्र रॉय यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते.

        या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे माजी उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी सांगितले की, "डॉक्टर हा केवळ एक व्यवसाय नाही, तर ती मानवतेची निःस्वार्थ सेवा आहे." त्यांनी पुढे सांगितले की, "आजच्या काळात डॉक्टरांनी केवळ व्यावसायिक तंत्रज्ञानावर नव्हे तर रुग्णाच्या वेदनांवर प्रेम आणि जबाबदारीने प्रतिसाद देण्याची गरज आहे."

डॉक्टर्स डे च्या निमित्ताने चंद्रपूर जिल्हा रुग्णालय, खासगी हॉस्पिटल्स, आरोग्य सेवा संघटना, आणि विविध वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. काही ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे झाली, तर काही ठिकाणी डॉक्टरांच्या प्रेरणादायी प्रवासावर व्याख्याने व चर्चासत्रे घेण्यात आली. या दिवशी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करण्याबरोबरच, त्यांनी वैद्यकीय नीतिमत्ता आणि व्यावसायिक मूल्यांचा विचार करत आत्मपरीक्षण करावे, हीसुद्धा या दिवसामागची महत्त्वाची भावना आहे.

डॉक्टर मंगेश गुलवाडे 👉 माजी उपाध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र राज्य

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top