संकटात जनतेच्या मदतीसाठी धावले आमदार सुधीर मुनगंटीवार!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ११ जुलै २०२५) -
राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री व विद्यमान आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व परिसरातील वैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घेतली असून, प्रशासनाला तत्काळ मदत कार्य सुरू करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. पुरामुळे अनेकांचे घर, शेती आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. याची गंभीर दखल घेत आ. मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. याचबरोबर सर्व पूरग्रस्तांना वेळेत शासकीय मदत मिळावी यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे आदेश संबंधित विभागांना दिले गेले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी भेट
आ. मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी दि. १० जुलै रोजी स्वतः पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्तांना तातडीची मदत मिळवून देण्यावर भर दिला जाणार आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांना दिलेले स्पष्ट आदेश
या संकटाच्या काळात भाजप पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी पोहोचून नागरिकांना सर्वतोपरी मदत करण्याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. प्रशासनाशी समन्वय साधून मदतीचे प्रयत्न सुरू ठेवण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले आहे.
स्वतः भेट देण्याची घोषणा
पावसाळी अधिवेशनानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार स्वतः जुनगाव आणि पूरग्रस्त गावांमध्ये भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करतील. त्यानंतर नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून ठोस निर्णय घेण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.