Online Gaming युवकांना जुगाराच्या गर्तेत लोटणाऱ्या अॅप्सवर सरकारने कारवाई करावी – आ. किशोर जोरगेवार यांची विधानसभेत मागणी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०९ जुलै २०२५) –
संपूर्ण देशात व महाराष्ट्रात ऑनलाइन गेमिंग अॅप्स मुळे युवकांमध्ये जुगाराची सवय वाढत असून, आत्महत्या व गुन्हेगारीच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे. मात्र, सरकारच्या आकडेवारीनुसार केवळ ९७ गुन्हे नोंदवले गेले आहेत. ही संख्या अत्यल्प असल्याचं सांगून आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात या गंभीर विषयावर आवाज उठवला.
ऑनलाइन गेमिंगमुळे युवक भरकटत आहेत
विधानसभेत बोलताना (MLA Kishorbhau Jorgewar) आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, "जंगली रमी", "ड्रीम इलेव्हन", "एमपीएल", "माय इलेव्हन सर्कल", "वन एसबीटी" अशा अॅप्समुळे युवकांना जुगाराची लागण होत आहे. या अॅप्सच्या टीव्ही जाहिरातींमध्ये नामवंत सेलिब्रिटी दिसतात, जे समाजावर वाईट प्रभाव टाकतात. सरकारने यावर तातडीने कठोर कारवाई करावी.
विशेष कायद्याची गरज – सरकारकडे मागणी
यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्पष्ट केलं की, सध्या अशा ऑनलाइन गेमिंग अॅप्सवर कारवाईसाठी कोणताही विशिष्ट कायदा अस्तित्वात नाही. परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार नियम तयार करण्यासाठी पत्र लिहिलं असून, राज्य सरकारही आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
धनशोधन अट लागू करा – जोरगेवार यांची सूचना
आमदार जोरगेवार यांनी यावेळी सरकारकडे अशीही मागणी केली की, भविष्यात तयार होणाऱ्या कायद्यात ‘धनशोधन निवारण अट’ (Anti Money Laundering Clause) समाविष्ट करावी आणि अशा अॅप्सवर तात्काळ बंदी घालण्यासाठी कठोर नियम तयार करावेत.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.