Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: अंगणवाड्या, पोस्ट ऑफिस, बँका – राजुरात जनतेच्या सेवांवर संपाचा परिणाम!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अंगणवाड्या, पोस्ट ऑफिस, बँका – राजुरात जनतेच्या सेवांवर संपाचा परिणाम! खाणीपासून डाक कार्यालयांपर्यंत संपाचा जोर, केंद्र सरकारविरोधात संताप!...
अंगणवाड्या, पोस्ट ऑफिस, बँका – राजुरात जनतेच्या सेवांवर संपाचा परिणाम!
खाणीपासून डाक कार्यालयांपर्यंत संपाचा जोर, केंद्र सरकारविरोधात संताप!
आमचा विदर्भ - प्रतिनिधी
राजुरा (दि. १० जुलै २०२५) -
        दिनांक ९ जुलै २०२५ रोजी देशभर पुकारण्यात आलेल्या राष्ट्रव्यापी संपाला राजुरा तालुक्यातील वेकोलीच्या सर्व कोळसा खाणींमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला. बल्लारपूर क्षेत्रातील ९ खाणींतील सुमारे ८० टक्के कामगारांनी संपात सहभाग घेतल्याने कोळशाचे उत्खनन व वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पहिल्या आणि दुसऱ्या पाळीत कामगारांनी कोळसा खाणीच्या प्रवेशद्वारांवर जोरदार घोषणा देत केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला.

        खाणगेटवर घोषणाबाजी व नेत्यांची भाषणे झाली. यामध्ये आयटकचे केंद्रीय अध्यक्ष नंदकिशोर म्हस्के, आशोक चिवंडे, श्रीपूरम रामलू, दिलीप कनकुलवार, बबन उरकुडे, रंगराव कुळसंगे, रायलेंगू झुपाका, विश्वास साळवे, भद्रय्या नातारकी, गणपत कुडे, विनोद देरकर, बंडू लांडे, सुरेश डाहूले, सचिन कुडे, दिनेश जावरे, कनकमकुमार, गजला इरय्या, धरम पाल, विजय कानकाटे, मोतीलाल बाबू, शेख जाहिद, सपना चन्ने, सीताराम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. संपात आयटक, एचएमएस, इंटक व सिटू यांच्यासह बँक, डाक व अंगणवाडी कर्मचारी संघटनांनी देखील आंदोलनात सहभाग घेतला.

संपामुळे खाणीत कोळसा उत्खनन व वाहतूक ठप्प
        सास्ती, गोवरी, साखरी, पोवनी (१ व २), गोवरी डीप, बल्लारपूर ओपनकास्ट व भूमिगत खाणींसह CGM कार्यालय, एरिया वर्कशॉप, स्टोअर आणि रुग्णालयांमध्ये कामगारांनी सकाळी ८ वाजता व दुपारी ४ वाजता एकत्रितपणे घोषणाबाजी केली. पावसातही आंदोलन सुरू होते, मात्र संपाची तीव्रता कमी झाली नाही. कामगार संघटनांच्या म्हणण्यानुसार, दैनंदिन ३५ हजार मेट्रिक टन कोळशाचे उत्पादन ठप्प झाले. ठाणेदार सुमित परतेकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस बंदोबस्त होता. संप शांततेत पार पडला.

बँक, पोस्ट, टेलिकॉम व अंगणवाडी सेवकांचा सहभाग
        राजुरा शहरातील राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट ऑफिस व दूरसंचार कर्मचारी यांनीही संपात सहभाग घेतल्याने दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले. अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा माया कासेट्टीवार, वर्षा खडसे व संगीता खाडे यांच्या नेतृत्वात शहरातील १२ अंगणवाड्या व तालुक्यातील सर्व अंगणवाड्या बंद होत्या.
चंद्रपूर पोस्ट ऑफिस समोर घोषणाबाजी
        अखिल भारतीय डाकसेवक संघटना, पोस्टमन ग्रुप डी व ग्रामीण डाक सेवक संघटनांनी चंद्रपूर मुख्य पोस्ट कार्यालयासमोर घोषणाबाजी केली. या आंदोलनात पोस्टमन ग्रुप डी चंद्रपूर सचिव राजू गोरे, प्रवीण माथनकर, साईनाथ भांडेकर, ग्रामीण डाक सेवक संघटना अध्यक्ष पंढरी झाडे, सचिव प्रणय देवावार, पद्माकर टोंगे, सुनील भोपये, मुरलीधर बोडखे, राजू धोटे, भारती करंडे सह शेकडो कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top