विठ्ठलनामाच्या गजरात चंद्रपूर ते वढा वारीचा मंगल प्रवास
आ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे भक्तिमय स्वागत
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०५ जुलै २०२५) -
आषाढी एकादशीच्या निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यातील श्रद्धास्थान तीर्थक्षेत्र वडा येथील विठ्ठल-रुक्माई मंदिराकडे पारंपरिक पायदळ वारीचे भव्य आयोजन करण्यात आले. या वारीची सुरुवात चंद्रपूर येथील महाकाली मंदिरापासून झाली. या भक्तिमय वारीचे सद्भावपूर्ण स्वागत आदरणीय आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात अत्यंत उत्साही वातावरणात करण्यात आले. वारीच्या स्वागतासाठी प्रकाश धारणे, किरण बुटले, नम्रता आचार्य ठेमसकर, उमेश आष्टनकर, सचिन कोतपल्लीवार, रवी लोणकर, सोहम बुटले, अमित निरंजने, प्रवीण उरकुडे तसेच डॉ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवाराचे असंख्य सदस्य सहभागी झाले होते. वारीचे नेतृत्व संत श्री चैतन्य महाराज करत होते. या वारीस शंकर वरारकर, सरपंच किरण बांदुरकर, तनुश्री बांदुरकर, बाळकृष्ण झाडे, शंकर वासेकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.
वारीदरम्यान "पांडुरंग विठ्ठल"च्या जयघोषात आणि टाळ-मृदंगाच्या निनादात शहर भक्तिमय झाले. जटपुरा गेट येथे रिंगण घालण्यात आले आणि घोड्याच्या शानदार तालमींनी वातावरण भारावून गेले. सर्व वारकऱ्यांसाठी अल्पोपहाराची व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. संपूर्ण वारीदरम्यान आ. सुधीर मुनगंटीवार मित्रपरिवारातर्फे वारकऱ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत झाले. भक्ती, सामाजिक एकता आणि श्रद्धेच्या संगमात ही पवित्र वारी तीर्थक्षेत्र वढा येथे प्रस्थान करून आषाढी एकादशीचे औचित्य अधिक मंगलमय बनवून गेली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.