Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: सीसीटीव्ही कार्यान्वयनासाठी युवासेनेचे पोलिसांना निवेदन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सीसीटीव्ही कार्यान्वयनासाठी युवासेनेचे पोलिसांना निवेदन बंटी पिपरे यांच्या नेतृत्वात युवासेनेचे निवेदन आंदोलन आमचा विदर्भ - दीपक शर्मा  राजु...
सीसीटीव्ही कार्यान्वयनासाठी युवासेनेचे पोलिसांना निवेदन
बंटी पिपरे यांच्या नेतृत्वात युवासेनेचे निवेदन आंदोलन
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०५ जुलै २०२५) -
        युवासेना प्रमुख मा.आ. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार, शिवसेना युवासेना सचिव मा.आ. वरुण सरदेसाई, युवासेना कार्यकारिणी सदस्य मा. हर्षल दादा काकडे, युवासेना पूर्व विदर्भ विभागीय सचिव मा. निलेश बेलखेडे, युवासेना चंद्रपूर जिल्हा विस्तारक मा. संदीप रियाल पटेल व युवासेना चंद्रपूर जिल्हा प्रमुख मा. विक्रांत सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना राजुरा शहर प्रमुख बंटी उर्फ शुभम अरुण पिपरे यांच्या नेतृत्वात राजुरा शहरातील महत्त्वाच्या समस्यांवर कार्यवाहीसाठी पुढाकार घेण्यात आला.

        राजुरा शहरातील काही सीसीटीव्ही कॅमेरे बंद स्थितीत असल्याने सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे. तसेच, शाळा व महाविद्यालय सुटण्याच्या वेळेस लहान मुला-मुलींना सुरक्षितपणे रस्ता पार करता यावा, यासाठी शहरातील प्रमुख चौकांवर ट्राफिक सिग्नल सुरळीत ठेवावेत व ट्राफिक पोलिसांची उपस्थिती वाढवावी, अशी लिहित स्वरूपात विनंती मा. पोलीस निरीक्षक, राजुरा यांना युवासेनेच्या वतीने सादर करण्यात आली.

        या वेळी युवासैनिक शहर प्रमुख बंटी उर्फ शुभम अरुण पिपरे, राजुरा विधानसभा उपजिल्हा प्रमुख कुणाल निळकंठ कुडे, तालुका प्रमुख बंटी मालेकर, तालुका चिटणीस प्रवीण पेटकर, शहर चिटणीस श्रीनाथ बोल्लूवार, युवासैनिक बळवंत ठाकरे, रोशन कुयते व इतर युवासैनिक उपस्थित होते. युवासेनेने दाखवलेला हा लोकहितकारी पुढाकार शहरातील सुरक्षेला हातभार लावणारा ठरेल, असा विश्वास नागरिक व्यक्त करत आहेत.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top