Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. २३ जून २०२५) –         धकाधक...
शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ जून २०२५) –
        धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत योगसाधना ही आरोग्याचे मूलभूत शस्त्र ठरते. शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, चंद्रपूर येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग व पतंजली योग सेवा समिती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एजाज शेख यांनी भूषवले. पतंजली योग सेवा समितीचे प्रतिनिधी देविदासजी ठावरी, श्रीकांतजी बावणे, सौ. मंजूषा तपासे, शामराव हरडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांसमोर विविध योगासने सादर केली व त्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन दिले.

        ठावरी सरांनी प्रत्येक आसनाचे फायदे, शरीरावर होणारे परिणाम, साधनेचा योग्य कालावधी यावर अभ्यासपूर्ण माहिती दिली. तर श्रीकांत बावणे यांनी सांगितले की, “योगामुळे आपण फक्त शरीराने नव्हे, तर मनानेही सुदृढ होतो. योग म्हणजेच अंतर्मुख होण्याची साधना आहे.” या उपक्रमाचे नियोजन NSS प्रमुख नंदकिशोर भंडारी आणि माजी NSS प्रमुख डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी उत्तम प्रकारे पार पाडले. कार्यक्रमात सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        प्राचार्य डॉ. एजाज शेख यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात म्हटले, “आजच्या स्पर्धात्मक जीवनात योग साधना म्हणजे मानसिक शांततेचा, आरोग्याचा आणि आत्मिक संतुलनाचा मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याने योग दिनाची एकदिवसीय परंपरा न मानता ती जीवनशैली म्हणून स्वीकारावी.” कार्यक्रमाचे संचालन डॉ. लीना लंगडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. सरोज कुमार दत्ता यांनी केले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top