Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: योगातून आरोग्य आणि आंतरिक शांततेकडे वाटचाल – आमदार किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
योगातून आरोग्य आणि आंतरिक शांततेकडे वाटचाल – आमदार किशोर जोरगेवार योग नृत्य परिवार ट्रस्टतर्फे प्रेरणादायी योग उपक्रम आमचा विदर्भ - दीपक शर्...
योगातून आरोग्य आणि आंतरिक शांततेकडे वाटचाल – आमदार किशोर जोरगेवार
योग नृत्य परिवार ट्रस्टतर्फे प्रेरणादायी योग उपक्रम
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ जून २०२५) –
        “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य” या संकल्पनेवर आधारित ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त चंद्रपूरमध्ये योग साधनेचे सामूहिक आयोजन करण्यात आले. योग नृत्य परिवार ट्रस्ट, चंद्रपूर मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमात शेकडो योगाभ्यासींनी सहभाग घेतला. या वेळी उपस्थित राहून आमदार किशोर जोरगेवार यांनी योगाचे महत्त्व विशद करताना सांगितले, की “योग ही भारताची प्राचीन देणगी असून ती केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक व आध्यात्मिक आरोग्याचा स्रोत आहे.”

        कार्यक्रमाचे आयोजन “एक पृथ्वी, एक स्वास्थ्य, वसुधैव कुटुंबकम् आणि फिटनेस फॉर सेल्फ” या व्यापक विषयांवर आधारित होते. या वेळी भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, योग नृत्य परिवारचे संस्थापक अध्यक्ष गोपाल मुंढडा, प्रदेश विशेष निमंत्रित सदस्य तुषार सोम, जिल्हाध्यक्ष सुरेश घोडके, महिला प्रभारी किशोरी विरुडकर, प्रमोद बावीसकर, हरिदास नागपूरे, विजय घोनमोडे, सरिता बावीसकर, आकाश घोडमारे, दिलीप पूण्यपवार, जितेंद्र इजगीलवार, प्रशांत कत्तूलवार, नरसु पोलसवार, आशिष झा, अशोक पडगीलवार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

        आमदार जोरगेवार पुढे म्हणाले, “योग हे केवळ आसन नसून, एक समर्पित आणि समतोल जीवन जगण्याची पद्धत आहे. तणावमुक्त जीवनासाठी, आंतरिक शांतीसाठी आणि सशक्त शरीरासाठी योग अत्यावश्यक आहे. आपण फक्त स्वतःच नव्हे, तर संपूर्ण समाजाचे आरोग्य घडवू शकतो, जर प्रत्येकाने फिटनेससाठी स्वतःच जबाबदारी घेतली.” ते पुढे म्हणाले की, “आपण प्रत्येक वॉर्डातील योग गटाला साहित्य पुरवले आहे आणि लवकरच विशेष योग शेड्सही उभारणार आहोत. या पायाभूत सुविधा निर्माण करून चंद्रपूरमध्ये योगसंपन्न वातावरण निर्मितीचे आमचे प्रयत्न सुरु आहेत.” या कार्यक्रमात शेकडो योगप्रेमींनी सहभाग घेतला आणि ‘योगा फॉर वेलनेस’चा संदेश जगभर पसरविण्याचा संकल्प केला.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top