Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बानिवाला व्यायामशाळेच्या भूमिपूजनाने तरुणाईसाठी आरोग्यदायी युगाची सुरुवात - आमदार किशोर जोरगेवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बानिवाला व्यायामशाळेच्या भूमिपूजनाने तरुणाईसाठी आरोग्यदायी युगाची सुरुवात - आमदार किशोर जोरगेवार बानिवाला व्यायामशाळेचे भूमिपूजन, तरुणांसाठी...
बानिवाला व्यायामशाळेच्या भूमिपूजनाने तरुणाईसाठी आरोग्यदायी युगाची सुरुवात - आमदार किशोर जोरगेवार
बानिवाला व्यायामशाळेचे भूमिपूजन, तरुणांसाठी नवा आरोग्यमंच
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २३ जून २०२५) –
        आजच्या धकाधकीच्या जीवनात तरुणांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य जपणे काळाची गरज झाली आहे. अशा परिस्थितीत योग्य व्यायाम, सशक्त मार्गदर्शन आणि प्रेरणादायी वातावरण मिळणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. चंद्रपूरच्या तरुणाईला हे सर्व एका ठिकाणी उपलब्ध व्हावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने दादमहल वॉर्डातील बानिवाला व्यायामशाळेच्या बांधकामाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी संपन्न झाला.

        या व्यायामशाळेच्या उभारणीसाठी आमदार जोरगेवार यांनी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, ही केवळ एक इमारत नसून तरुणांना शारीरिक सक्षमतेसह मानसिक बळ देणारे एक शिस्तबद्ध प्रशिक्षणकेंद्र ठरेल, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. भूमिपूजन सोहळ्याला भाजप महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, प्रदेश निमंत्रित सदस्य तुषार सोम, अजय वैरागडे, राशिद हुसेन, बशीर पठाण, श्याम धोपटे, किरणे ठाकरे, शेखर शेट्टी, नाहिद हुसेन, करणसिंह बैस आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

        आमदार जोरगेवार यांनी आपल्या भाषणात पुढे सांगितले की, "माता महाकाली राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा ही चंद्रपूरसह संपूर्ण महाराष्ट्रात ओळखली जाते. या परंपरेला चालना देण्यासाठी व नवोदित बॉडीबिल्डर तयार करण्यासाठी अत्याधुनिक व्यायामशाळेची उभारणी आवश्यक होती, जी आता साकार होत आहे." ते पुढे म्हणाले, "विकास म्हणजे केवळ रस्ते व इमारती नव्हे, तर योग्य मार्गदर्शन मिळालेल्या युवकांची घडवणूक हाच खरा विकास आहे. बानिवाला व्यायामशाळा ही सामाजिक संकल्पनेचा भाग असून, समाजहिताच्या दिशेने एक भक्कम पाऊल आहे." जोरगेवार यांनी मतदारसंघात व्यायामशाळा, समाजभवने व अभ्यासिका अशा उपक्रमांवर विशेष भर दिला असून, या सुविधांमुळे युवकांना आत्मनिर्भरतेचा मार्ग मोकळा होतो. "आज आपण जे पाऊल टाकले आहे, ते उद्या आपल्या परिसरातील अनेक तरुणांना आरोग्य, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेच्या दिशेने मार्गदर्शक ठरेल," असे उद्गार त्यांनी काढले.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top