Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: जागतिक रेड क्रॉस दिन: ''मानवतेची सर्वोच्च आदर्श जपणारी चळवळ''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
World Red Cross Day जागतिक रेड क्रॉस दिन: ''मानवतेची सर्वोच्च आदर्श जपणारी चळवळ''         दरवर्षी ८ मे रोजी संपूर्ण जगभर जाग...
World Red Cross Day
जागतिक रेड क्रॉस दिन: ''मानवतेची सर्वोच्च आदर्श जपणारी चळवळ''
        दरवर्षी ८ मे रोजी संपूर्ण जगभर जागतिक रेड क्रॉस दिन (World Red Cross Day) साजरा केला जातो. हा दिवस रेड क्रॉस चळवळीचे संस्थापक हेन्री ड्युनेट यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा करण्यात येतो. संकटसमयी मदतीचा हात देणारी, माणुसकीची खरी ओळख जपणारी रेड क्रॉस संस्था आज जगातील सर्वात मोठ्या मानवतावादी संघटनांपैकी एक आहे.

इंडियन रेड क्रॉस सोसायटीचा इतिहास:
        भारतात रेड क्रॉस चळवळीचा प्रारंभ १९२० साली झाला. इंडियन रेड क्रॉस सोसायटी (IRCS) ही भारतीय संसदेने १९२० मध्ये पारित केलेल्या "Indian Red Cross Society Act" अंतर्गत स्थापन करण्यात आली. प्रारंभी भारताचे तात्कालिक गव्हर्नर जनरल हे या संस्थेचे अध्यक्ष असत. स्वातंत्र्यानंतर भारताचे राष्ट्रपती हे संस्थेचे प्रमुख बनले.

IRCS चे कार्यक्षेत्र:
आपत्ती व्यवस्थापन
आरोग्यसेवा आणि रक्तदान शिबिरे
प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रम
महामारीविरोधी उपाययोजना
ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे

चंद्रपूर जिल्ह्यातील रेड क्रॉस कार्य:
        चंद्रपूर जिल्ह्यात IRCS च्या माध्यमातून रक्तदान शिबिरे, रोग निदान शिबिरे, ज्येष्ठ नागरिकांसाठी ब्लड शुगर व रक्तदाब तपासणी, कॅन्सर रोग निदान शिबिरे, तसेच विविध आपत्कालीन परिस्थितींमध्ये मदतकार्य केले जाते. जिल्हाधिकारी हे जिल्ह्याचे अध्यक्ष असतात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम राबवले जातात.

आगामी उपक्रम:
        आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यात सिकलसेल, थॅलेसिमिया आणि हिमोग्लोबिनपॅथीचे निदान आणि उपचार शिबिरे आयोजित करण्याचे नियोजन आहे. तसेच भारतीय जनऔषधी परियोजनेच्या माध्यमातून ना नफा ना तोटा या तत्त्वावर मेडिकल स्टोअर्स देखील चालवले जाते.

जागतिक योगदान:
        रेड क्रॉस हे आंतरराष्ट्रीय संघटन असून त्याचे मुख्यालय स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा येथे आहे. १८६३ साली या चळवळीची स्थापना झाली. १९०१ साली हेन्री ड्युनेट यांना शांततेचा नोबेल पुरस्कार प्राप्त झाला.

जागतिक रेड क्रॉस दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा !
    डॉक्टर मंगेश गुलवाडे
    सचिव, इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top