स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार?
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०५ मे २०२५) -
शिवसेना पक्षाचे पूर्व विदर्भ संघटक किरण पांडव यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात जिल्हास्तरीय शिवसेना आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत सदस्य नोंदणी अभियान, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडणूक नियोजन, संघटनात्मक बांधणी व पक्षप्रवेश या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. किरण पांडव यांनी आपल्या भाषणात स्पष्ट केले की, "चंद्रपूर जिल्ह्यात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका स्वबळावर लढून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बळ वाढवणे हीच प्राथमिकता राहील." त्यांनी तालुका पातळीवर शाखा सुरू करून सदस्य नोंदणी अभियान तीव्रतेने राबवण्याचे आदेश दिले. संघटन विस्तारासह शिवसेनेचा बालेकिल्ला मजबूत करण्याच्या दिशेने हा दौरा निर्णायक ठरला, असे राजकीय वर्तुळात बोलले जात असून स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेना स्वबळावर लढणार अशीही चर्चा झाल्याने मित्रपक्ष गटात बेचैनी निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.
या बैठकीला पूर्व विदर्भ सदस्य नोंदणी अभियान निरीक्षक संदिपनी बरडे, जिला संपर्क प्रमुख किशोर राय, जिल्हा संघटक युवराज धानोरकर, जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीन मत्ते, महिला जिल्हाप्रमुख प्रतिमा ठाकूर, भारती राखडे, शैलेश केळझरकर, भरत ठाकुर, संतोष पारखी, वाणी सादलावार, मायाताई मेश्राम, आशीष ठेंगणे, जमील शेख, पंकज वडेट्टीवार, श्रीकांत खेगार, राकेश राठोड, देवचंद मडावी, भरत बिराजदार, खुशाल सुर्यवंशी, नरेंद्र नरड, जालींदर गायकवाड, उमेश गोलेपलीवार, विलास अगे, विक्की राठोड, दिपक बेले, अविनाश उके, मनिष खुचे, प्रथम गेडाम, बडू पानपटे, योगीता घोधडे, शैलेश सदलावार, अफर बेग, मोनीदयेरेवार, तेजस गाणार, सुचक देखणे, नयन जगम, पियुष ठाकूर, प्रणित ठाकुर, श्रेयांस ठाकूर, रोशन पॉल, उमेश कुंडले, अमोल वैसे, साईसाई पीडवार, राईल तालावार, अभीजीत मडकावार, भैय्यू, सागर, नितीन, निखील, सौरभ, विनोद चांदेकर, नरेश काळे, विलास परचाके, शालीनी खैरे, अपेक्षा वंगलवार, निता पिपरे, शितल कंदीकुरवार, साधना नामेवार, आशिष टिकले आणि इतर तालुका, शहर व विधानसभा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.