Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्ट्राटेक कंपनी समोर पालगाव वासियांचे ठिय्या आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्ट्राटेक कंपनी समोर पालगाव वासियांचे ठिय्या आंदोलन रस्त्याचा मागणीकरिता गावकर्यांनी दिला ठिय्या आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत गडचांदुर (द...
अल्ट्राटेक कंपनी समोर पालगाव वासियांचे ठिय्या आंदोलन
रस्त्याचा मागणीकरिता गावकर्यांनी दिला ठिय्या
आमचा विदर्भ - धनराजसिंह शेखावत
गडचांदुर (दि. ०५ मे २०२५) -
        कोरपना तालुक्यातील पालगाव व बाखर्डी येथील ग्रामस्थांनी पक्क्या रस्त्याच्या मागणीसाठी अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या ADM गेटसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मागील ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पालगाव ते माइन्स या तीन किलोमीटर रस्त्याच्या बांधकामासाठी ग्रामस्थांनी शांततेत आंदोलन सुरू करत आपली न्याय्य मागणी मांडली आहे. या आंदोलनाचे नेतृत्व बाखर्डी-पालगावचे सरपंच अरुण रागीट करीत असून महिला, युवक, वृद्ध, आणि शालेय मुले मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. आंदोलनाची सुरुवात सकाळी १० वाजता करण्यात आली.

रस्त्याविना रोजचा संघर्ष:
        या मार्गाने रात्री प्रवास करताना धोका निर्माण होतो. पावसाळ्यात कीचकट चिखल, तर उन्हाळ्यात धुळीमुळे त्रास – असा ग्रामस्थांचा रोजचा संघर्ष आहे. विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी वाहतूकसुविधा नसल्यामुळे शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

अल्ट्राटेक कंपनीकडून दुर्लक्ष:
        तिन वाजेपर्यंत कोणताही अधिकारी आंदोलनस्थळी भेट देत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी संध्याकाळी ५:३० वाजता अल्ट्राटेकच्या नांदाफाटा मुख्य गेटवर ठिय्या आंदोलन सुरु केले. परिणामी, मुख्य मार्ग बंद करण्यात आला.

लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही:
        सरपंच अरुण रागीट यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत कंपनी रस्त्याचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन थांबवले जाणार नाही.

ब्लास्टिंगमुळे घरांना धोका:
        अल्ट्राटेकच्या माईन्सजवळील गावात वारंवार होणाऱ्या ब्लास्टिंगमुळे अनेक घरांना भेगा पडत असून, गाव पुनर्वसनाच्या संकटात सापडत असल्याची धास्ती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

कंपनीकडून पुढील वर्षीचे आश्वासन:
        अल्ट्राटेक कंपनीचे प्रतिनिधी प्रतीक वानखडे यांनी सांगितले की, “कंपनीने यंदा अनेक विकासकामे केली असून, पुढील आर्थिक वर्षात रस्त्याच्या कामासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे."

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top