Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ब्रेकडाऊन ट्रकने घेतला बळी-नागरिकांचा संताप उसळला!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''ब्रेकडाऊन ट्रकने घेतला बळी-नागरिकांचा संताप उसळला!" ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर संतप्त नागरिकांचा आक्रोश आमचा विदर्भ - दीपक शर्मा ...
''ब्रेकडाऊन ट्रकने घेतला बळी-नागरिकांचा संताप उसळला!"
ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर संतप्त नागरिकांचा आक्रोश
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
घुग्घूस (दि. ०५ मे २०२५) -
       रविवारी रात्री १० वाजता घुग्घूस साखरवाई मार्गावर मुर्सा गावाजवळ एक भीषण अपघात घडला. महामाया कोल वॉशरीजमध्ये सुपरवायजर म्हणून कार्यरत असलेले सुभाष नगर येथील नवीन पोनगंटी (वय ३८) हे ड्युटीवर जात असताना त्यांच्या दुचाकीने उभ्या ब्रेकडाऊन ट्रकला जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात अंधारात उभ्या असलेल्या १८ चाकी ट्रकमुळे झाली, ट्रकला कोणतेही रेडीयम, रिफ्लेक्टर अथवा इशारा न लावता रस्त्यावर सोडून देण्यात आला होता. मृतकाच्या पश्चात पत्नी व चार वर्षाचा मुलगा आहे. मृतक हा कुटुंबाचा एकमेव कमावता होता.

        अपघातानंतर सोमवारी मृतकाचे नातेवाईक, स्थानिक नागरिक, आणि विविध राजकीय व सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी ट्रान्सपोर्ट कंपनीसमोर जमले. मृतदेह कंपनी कार्यालयात ठेवून तब्बल ५ तास धरना आंदोलन करण्यात आले. यावेळी नातेवाईकांनी ५० लाख रुपयांची नुकसानभरपाई कंपनीकडून मागितली. या आंदोलनात काँग्रेसचे घुग्घूस अध्यक्ष राजु रेड्डी, भाजपचे शहर अध्यक्ष विवेक बोडे, ज्येष्ठ नेते चिन्ना नलबोगा, कामगार नेते सय्यद अनवर, नवीन मोरे, माजी उपसरपंच संजय तिवारी आदी उपस्थित होते. कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने बंटी जयस्वाल व गणेश चर्तुकर यांनी मध्यस्थी केली. शेवटी कंपनीने ८ लाख रुपयांची भरपाई देण्याचे मान्य केले, त्यापैकी १ लाख रुपये रोख स्वरूपात तर उर्वरित ७ लाख रुपये मंगळवारी मृतकाच्या पत्नीच्या खात्यात वर्ग करण्यात येणार आहेत. या काळात घुग्घूस पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रकाश राऊत स्वतः आपल्या पथकासह घटनास्थळी उपस्थित होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली.

अंधारात बळी घेणारे ट्रक – प्रशासनाचे दुर्लक्ष सुरूच!
        घुग्घूस-वणी, साखरवाई आणि चंद्रपूर मार्गांवर दररोज मोठ्या प्रमाणावर १८ चाकी ट्रक उभे असतात. यापैकी बहुतेक ट्रकवर रेडीयम पट्ट्या किंवा रिफ्लेक्टर नसतात. पोलिस आणि परिवहन विभाग याकडे दुर्लक्ष करत आहेत. अशा निष्काळजीपणामुळेच नवीन पोनगंटी यांचा जीव गेला. नागरिकांनी आता यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top