"पठाणपुरा गेटबाहेर रेत माफियांचे उघडसफाईचे धंदे"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०७ मे २०२५) -
चंद्रपूर शहरातील पठाणपुरा गेट परिसरात इरई नदी आणि नाल्यांमधून अवैध रेत उत्खनन व वाहतूक जोरात सुरू आहे. पठाणपुरा गेट ते जमनजट्टी रोड आणि शिवणी माढा रोड या मार्गांवर रेताने भरलेले ट्रॅक्टर, हाफ टन वाहने आणि इतर गाड्या सर्रास दिसून येतात.
स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की, या अवैध रेत वाहतुकीमध्ये मोठ्या राजकीय नेत्यांचा हात आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन, तहसीलदार आणि महसूल विभागाचे अधिकारी या सर्वांवर फक्त मूकदर्शक बनले आहेत. या परिसरातील रामनगर पोलिस ठाणे आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हे प्रकार खुलेआम सुरू आहेत, परंतु अद्याप कोणतीही कठोर कारवाई झालेली नाही.
स्थानिकांनी दिनांक ०६/०३/२०२५ रोजी प्रशासनाकडे निवेदन दिले होते, परंतु आज दिनांक ०७/०५/२०२५ पर्यंत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. यामुळे रेत माफियांना सरकारी संरक्षण मिळत आहे का? की अधिकारी आणि माफिया यांच्यात मिलीभगत आहे? प्रश्न असा आहे की पोलिस आणि महसूल विभाग या रेत माफियांवर कारवाई का करत नाहीत? या चुप्पीच्या मागे कोणती गुप्त साजिश आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.