Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: बल्लारपूरमधील ऑटोमोबाइल्स दुकानात अडीच लाख रुपयांची चोरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
बल्लारपूरमधील ऑटोमोबाइल्स दुकानात अडीच लाख रुपयांची चोरी आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी बल्लारपूर (दि. 08 मे 2025) -         बल्लारपूर...
बल्लारपूरमधील ऑटोमोबाइल्स दुकानात अडीच लाख रुपयांची चोरी
आमचा विदर्भ - राजेश अरोरा, प्रतिनिधी
बल्लारपूर (दि. 08 मे 2025) -
        बल्लारपूर शहरातील बीटीएस चौकातील श्रीहरी ऑटोमोबाइल्स या दुकानाचे शटर उचकटून अज्ञात चोरांनी 2 लाख 50 हजार रुपये रोख लंपास केल्याची घटना 6 मे च्या मध्यरात्री घडली आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

        बीटीएस चौक, गुरुनानक पब्लिक स्कूल समोर असलेल्या अवधेशकुमार शारदानंद शाह यांचे श्रीहरी ऑटोमोबाइल्स हे दुकान आहे. 5 मे रोजी रात्री 9 वाजता दुकान बंद करून शाह घरी गेले. मात्र 6 मे रोजी सकाळी 6 वाजता गुरुनानक पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपॉल लक्ष्मी यांनी शेजारील दुकानदार मनिष राखुंडे यांना फोन करून दुकानाचे शटर खुले दिसत असल्याचे कळवले.

       मनिष राखुंडे यांनी तात्काळ अवधेशकुमार शाह यांना माहिती दिली. शाह आपल्या दुकानात पोहचले असता शटर मधोमध उचललेले होते, तर बाजूच्या कुलूपांना हात लावलेला नव्हता. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पाहणी केली असता, टेबलच्या ड्रॉवरचे लॉक तोडून त्यातील 2 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम लंपास करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. अवधेशकुमार शाह यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध कलम 305, 334, (1) BNS अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मदन दिवटे अधिक तपास करीत आहेत. बल्लारपूर शहरात यापूर्वीही शटर उचलून चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेतील चोरटे अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top