Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण - आरोपीला अटक
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण - आरोपीला अटक आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स घुग्घूस (दि. 08 मे 2025) -          घुग्घूस येथे एका अल्पवयीन मुलील...
अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण - आरोपीला अटक
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
घुग्घूस (दि. 08 मे 2025) -
         घुग्घूस येथे एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक शोषण करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीचे नाव मधुकर समर्थ (वय 48 वर्षे) असून, तो घुग्घूस येथील रहिवासी आहे. घुग्घूस येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले. या प्रकरणाची तक्रार पिडीत मुलीच्या कुटुंबीयांनी घुग्घूस पोलीस स्टेशन येथे दाखल केली. तक्रारीनुसार, आरोपीविरुद्ध कलम 137(2) भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांच्या आदेशानुसार, पोलीस निरीक्षक प्रकाश राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन तायवाडे यांच्या नेतृत्वात सपोनि योगेश पाटील, पो.ह. अनिल बैठा व शिपाई अलकेश सावंत यांच्या पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे, 5 मे रोजी आरोपीला वर्धा जिल्ह्यातील कपाशी (राळेगाव) येथून अल्पवयीन मुलीसह ताब्यात घेण्यात आले. आरोपी मधुकर समर्थ यांच्याविरुद्ध कलम 64, 64(2)(m) भा.द.वी. आणि सहकलम 4, 6 पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि योगेश पाटील करीत आहेत.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top