Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Tiger Attack सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Tiger Attack सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला – तीन ठार, एक जखमी आमचा विदर्भ - अनंता गोख...
Tiger Attack सिंदेवाही तालुक्यात वाघाचा थरार
तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या महिलांवर वाघाचा हल्ला – तीन ठार, एक जखमी
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर / सिंदेवाही (दि. १२ मे २०२५) -
उन्हाळ्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात तेंदूपत्ता संकलनाचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असते. तेंदूपत्ता संकलनासाठी नागरिक गावालगतच्या जंगलपरीसरात जात असतात. सिंदेवाही तालुक्यातील मेंढा माल येथील महिला तेंदूपत्ता संकलनासाठी गेल्या असता पट्टेदार वाघाने हल्ला (Tiger Attack) करून तीन महिलांना ठार केल्याची घटना शनिवार दि. १० मे रोजी घडली. मृतकांमध्ये रेखा शालीक शेन्डे वय ५५ वर्षे, शुभांगी मनोज चौधरी वय ३३ वर्षे, कांता बुधा चौधरी वय ६० वर्षे रा.मेंढा (माल) यांचा समावेश असून वंदना विनायक गजभिये वय ५० वर्षे रा.चारगाव बडगे ही महिला जखमी आहे. या घटनेने सिंदेवाही तालुक्यात शोककळा पसरली आहे.

        मिळालेल्या माहितीनुसार, सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील चारगाव – मेंढा जंगल परिसरातील डोंगरगाव बिटातील कम्पार्टमेंट न. १३५५ मध्ये तेंदुपत्ता संकलनासाठी काही महिला गेल्या होत्या. यावेळी दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून तीन महिलांना ठार केले तर एक महिला जखमी झाली आहे. सध्या तेंदूपत्ता संकलनाचा हंगाम असल्याने गरीब महिला तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात जातात. या हल्ल्यात चारगाव बडगे येथील वंदना गजभिये जखमी झाल्याची माहिती गावात होताच तिला उपचारासाठी पाठविण्यात आले. वनविभाग, पोलीस व नागरीकांच्या मदतीने शोध घेतला असता तिन्ही महिला मृतावस्थेत आढळल्या. मृतक रेखा शेन्डे हिला पती, दोन मुले; शुभांगी चौधरी हिला पती, एक मुलगा आणि एक मुलगी; तर कांता चौधरी हिला एक मुलगा असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा तपास वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्या मार्गदर्शनात सुरू असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. वन्यजीव व मानव संघर्ष पुन्हा एकदा समोर आला असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.

Advertisement

Next
This is the most recent post.
Previous
थोडे जुने पोस्ट

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top