Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''बेरोजगारीवर मात करा'' चंद्रपूरमध्ये येत आहे उद्योग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''Overcome-unemployment'' ''बेरोजगारीवर मात करा'' चंद्रपूरमध्ये येत आहे उद्योग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी! आमचा...
''Overcome-unemployment''
''बेरोजगारीवर मात करा''
चंद्रपूरमध्ये येत आहे उद्योग प्रशिक्षणाची सुवर्णसंधी!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
चंद्रपूर (दि. १२ मे २०२५) -
येत्या २४ मे रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शिका, कमवा व प्रगती करा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशन, रेल्वे याञी एकता मजूर संघ, आणि राष्ट्रीय उद्योग भारत तथा पर्यावरण संवर्धन व विकास समीती महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

‘शिका, कमवा व प्रगती करा’ हा अभियान सकाळी ९:०० वाजता सुरू होणार असून सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमात रोजगार, उद्योग प्रशिक्षण आणि महाराष्ट्राचा अभिमान पुरस्कार २०२५ चे वितरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे मुख्य उद्घाटक आदिवासी विभाग राज्यमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके असतील. कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन असतील.

या कार्यक्रमात मराठी अभिनेत्री रांगडा मुवी फेम कु. मयुरी नव्हाते या विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राष्ट्रीय उद्योग संघटनेचे महामंत्री सुनिल कुमार मांडवे, शिक्षण विभागाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती गिरिजा ताई उईके, पोलिस उपनिरीक्षक कु. दीप्ती मरकाम आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम बेरोजगार तरुणांसाठी विशेष संधी देणारा आहे. विविध प्रशिक्षण सत्रांद्वारे युवकांना नवीन कौशल्ये शिकण्याची आणि त्याद्वारे नोकरीच्या संधी मिळवण्याची संधी मिळणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन यहोवा यिरे फाउंडेशनचे सीईओ, डॉ. रमेशकुमार बोरकुटे यांनी केले असून, त्यांचा उद्देश बेरोजगारी दूर करणे आणि तरुणांना स्वावलंबी बनवणे हा आहे.

नांव नोंदणी व अधिक माहिती करिता 9834479473 / 9637578591 या नंबरवर संपर्क करू शकता. 

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top