Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: पेरणीपूर्व हंगामात शेतकऱ्यांवर संकट: विज कोसळून बैल ठार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
पेरणीपूर्व हंगामात शेतकऱ्यांवर संकट: विज कोसळून बैल ठार आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स जिवती (दि. १० मे २०२५) -         तालुक्यातील सारंगापू...
पेरणीपूर्व हंगामात शेतकऱ्यांवर संकट: विज कोसळून बैल ठार
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
जिवती (दि. १० मे २०२५) -
        तालुक्यातील सारंगापूर येथील शेतकरी बाबुराव चव्हाण यांच्या बैलावर विज कोसळल्याने बैलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे विजांच्या कडकडाटात बैल चरण्यासाठी रानात असताना त्याच्यावर विज कोसळली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

        शेतकरी बाबुराव चव्हाण यांचे हे बैल त्यांच्या शेतीसाठी महत्त्वाचे होते. पेरणीपूर्व हंगामात बैलाचा मृत्यू झाल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. शेतीकामासाठी अत्यावश्यक असलेल्या या बैलामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी केली आहे.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top