Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''वाघाचा कहर: तीन दिवसांत पाच बळी''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''वाघाचा कहर: तीन दिवसांत पाच बळी'' जंगलात तेंदुपत्ता तोडताना वाघाने घेतला महिलेचा जीव आमचा विदर्भ - अनंता गोखरे मूल - चंद्र...
''वाघाचा कहर: तीन दिवसांत पाच बळी''
जंगलात तेंदुपत्ता तोडताना वाघाने घेतला महिलेचा जीव
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
मूल - चंद्रपूर (दि. १३ मे २०२५) -
        तेंदुपत्ता तोडण्यासाठी भादुर्णा येथील बफर झोन क्षेत्रातील जंगलात गेलेल्या महिलेला वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सोमवारी (दि. १२ मे) सकाळी ७.३० वाजता घडली. या हल्ल्यात मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव भुमेश्वरी दिपक भेंडारे असे आहे. भुमेश्वरी ही मूल तालुक्यातील भादुर्णा येथील रहिवासी असून, तिचा विवाह केवाडा (पेठ) येथील दिपक भेंडारे यांच्याशी झाला होता. काही काळ पतीसोबत राहिल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे भादुर्णा येथे आली. कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पती-पत्नी मिळेल ते काम करीत असताना सोमवारी सकाळी तेंदुपत्ता तोडण्यासाठी ती आई-वडील आणि पतीसह जंगलात गेली होती. तेंदुपत्ता तोडत असतानाच दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला केला आणि भुमेश्वरीला जागीच ठार केले. आरडाओरड करताच वाघ पळून गेला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

वन्यजीवांचा धोकादायक सुळसुळाट:
        भादुर्णा परिसरातील बफर झोन क्षेत्रात वाघांच्या सततच्या हालचालींमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या तीन दिवसांत वाघाच्या हल्ल्यात पाच बळी गेले आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. स्थानिक प्रशासनाने जंगल क्षेत्रात सतर्कता वाढविण्याची मागणी केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top