Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: धोपटाला प्रकल्पग्रस्तांना दिलासा! 84 नोकरी प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
धोपटाला प्रकल्पग्रस्तांना दिलासा! 84 नोकरी प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर तुकडेबंदी कायद्याचा अडसर दूर; प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश! आमचा...
धोपटाला प्रकल्पग्रस्तांना दिलासा! 84 नोकरी प्रस्ताव मंजुरीच्या मार्गावर
तुकडेबंदी कायद्याचा अडसर दूर; प्रकल्पग्रस्तांच्या संघर्षाला यश!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा 
राजुरा (दि. ०४ मे २०२५) -
        राजुरा उपविभागीय अधिकारी व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशामुळे धोपटाला युजी-2 ओसी कोळसा प्रकल्पातील 84 प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी प्रस्तावात निर्माण झालेले अडथळे अखेर दूर झाले आहेत. यासंदर्भात 11 एप्रिल 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंतिम निर्णय घेण्यात आला. लवकरच इतर 9 प्रकल्पग्रस्तांच्या नोकरी संदर्भातील आदेशही पारीत होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

        या प्रकरणात "तुकडेबंदी कायदा" अंतर्गत काही तांत्रिक अडचणींमुळे नोकरी मंजुरी थांबवण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी, राजुरा यांचा दिनांक 24 सप्टेंबर 2024 रोजीचा आदेश आणि जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचा 11 एप्रिल 2025 रोजीचा आदेश यानुसार नागपूर मुख्यालयाने सर्व थांबवलेले प्रस्ताव परत बोलावले आहेत.

        या लढ्यामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या पाठीशी सातत्याने खंबीरपणे उभे राहणारे हंसराज अहीर, अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्ग आयोग, यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आणि प्रयत्नांमुळेच हा निर्णय शक्य झाला. प्रकल्पग्रस्तांनी अहीर यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आणि कृतज्ञता व्यक्त केली. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, नोकरीप्राप्तीची वाट अखेर मोकळी झाली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top