Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: वादळ-वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त आदिवासी महिलांचे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
वादळ-वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त आदिवासी महिलांचे आंदोलन अल्ट्राटेकच्या हापरवर ठिय्या, काम बंद पाडले आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स कोरप...
वादळ-वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर संतप्त आदिवासी महिलांचे आंदोलन
अल्ट्राटेकच्या हापरवर ठिय्या, काम बंद पाडले
आमचा विदर्भ - ब्युरो रिपोर्ट्स
कोरपना (दि. ०५ एप्रिल २०२५) –
        गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमीन हक्काच्या लढ्याला न्याय न मिळाल्यामुळे अखेर गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या कुसुंबी चुनखडी खदानीत संतप्त आदिवासी महिलांनी दगड क्रेशिंग यंत्रावर ठिय्या देऊन काम बंद पाडले. “जमिनीचा ताबा द्या नाहीतर मोबदला द्या” असा ठाम इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे. कुसुंबी येथील जमिनीचा वाद गेल्या अकरा वर्षांपासून प्रलंबित आहे. महसूल व पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा प्रश्न चिघळला असून, आदिवासी कोलाम समाजाच्या तक्रारी सातत्याने दुर्लक्षित करण्यात येत आहेत. भूमापनाची मागणी, वनविभागाच्या जमिनीवर अनधिकृत बांधकाम, पाण्याचे साठे, स्फोटांचे परिणाम, ग्रामसभेचे ठराव – या सर्व बाबींवर प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे.

       26 नोव्हेंबर 2024 पासून कुटुंबांसह शंकर मंदिराजवळ आंदोलन सुरू असतानाही प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले. याच निषेधार्थ 3 मे रोजी महिलांनी थेट खदानीवर जाऊन यंत्रणा बंद केली. पोलीसांनी घटनास्थळी जाऊन महिलांना शांत केले, मात्र आदिवासी महिलांचा रोष कायम आहे. ग्रामसभेने आधीच 199 हेक्टर जमिनीच्या चौथ्या टप्प्याला विरोध केला आहे. तरीही नवीन खदानीसाठी प्रयत्न सुरू असल्याने आदिवासींचा संशय अधिकच वाढला आहे. आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, “प्रशासनाने जर यापुढेही दुर्लक्ष केले, तर खदानीचे संपूर्ण काम ठप्प करू.”

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top