लाच घेताना ZP अभियंता आणि कर्मचारी अडकल्याचे उघड!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 11 एप्रिल 2025) -
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागातील कार्यकारी अभियंता हर्ष बोहरे, वरिष्ठ सहायक सुशील गुंडावार आणि कंत्राटी परीचर मो. मतीन शेख यांना लाच मागणी व स्वीकार प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. तक्रारदाराने जल जीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामांसाठी मंजुरीसाठी सादर केलेल्या बिलांपैकी 5 गावांच्या 43 लाखांच्या बिलांना मंजुरी मिळाल्यानंतर उर्वरित बिल मंजुरीसाठी एकूण 4 लाख 20 हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती.
त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी सापळा रचून 10 एप्रिल 2025 रोजी अटक कारवाई केली. सुशील गुंडावार यांनी रक्कम स्विकारून त्यातील 4 लाख मतीन शेख यांच्यामार्फत हर्ष बोहरे यांच्या घरी पोहोचवली. तिघांनाही अटक करण्यात आली असून रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
सदर कारवाई नागपूर ला.प्र.वि. पोलिस अधीक्षक डॉ. दिगंबर प्रधान, नागपूर ला.प्र.वि. अपर पोलीस अधीक्षक सचिन कदम, नागपूर ला.प्र.वि. अपर पोलीस अधीक्षक संजय पुरंदरे, यांचे मार्गदर्शनात ला.प्र.वि. चंद्रपूर पोलीस उप अधीक्षक श्रीमती मंजुषा भोसले, पो.नि. जितेंद्र गुरनूले, हिवराज नेवारे, नरेशकुमार नन्नावरे, रोशन चांदेकर, अमोल सिडाम, प्रदीप ताडाम, वैभव गाडगे, पुष्पा काचोळे, सतिश सिडाम, संदिप कौरासे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन
जर कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्ती तुमच्याकडून कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायद्याने निश्चित केलेल्या फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर कृपया लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी तात्काळ संपर्क साधण्याचे आवाहन लाचलुचपत विभागाद्वारे करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.