Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारा युवा!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारा युवा! देवेन टोंगे यांचा प्रेरणादायी वाढदिवस आमचा विदर्भ -  अनंता गोखरे  राजुरा (दि. १४ एप्रिल २०२५) -        ...
सामाजिक दायित्वाची जाण ठेवणारा युवा!
देवेन टोंगे यांचा प्रेरणादायी वाढदिवस
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. १४ एप्रिल २०२५) -
        नेफडोचे गडचांदुर शहर बाल संघटक देवेन रितेश टोंगे यांनी त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून निंबाळा (ता. राजुरा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावातील मुलांना क्रिकेट व व्हॉलीबॉल किट वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून कळमनाचे सरपंच नंदकिशोर वाढई यांनी उपस्थित राहून "सामाजिक दायित्व जोपासत आपले कर्तव्यही जपावे" असा मोलाचा संदेश दिला.

        कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गणेश मेश्राम, सदस्य देवानंद मोहारे, विठ्ठल परचाके, ग्रामसेवक सिताराम मरापे, नैसर्गीक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे पदाधिकारी व सदस्य तसेच कोरपणा तालुका महिला अध्यक्षा उषा टोंगे, सचिव अरुणा सालवटकर, संघटीका सुलभा कुरेकर आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. शाळेला भारताचे संविधानाचे पुस्तक भेट देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल बेले यांनी केले तर आभार प्रदर्शन स्मिता विरुटकर यांनी मानले. या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कविता शर्मा, बबलू चव्हाण, रवी बुटले, प्रणिता मांडवकर, सुवर्णा बेले यांचे योगदान लाभले.


About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top