Crushed sand घरकुल बांधकामासाठी क्रश सॅन्डचा उपयोग
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०४ एप्रिल २०२५) -
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) (Pradhan Mantri Awas Yojana) अंतर्गत मोठ्या संख्येने (gharkul) घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, नैसर्गिक वाळूच्या तुटवड्यामुळे बांधकामे रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने लाभार्थ्यांना क्रश सॅन्डचा (Crushed sand) वापर करण्याचे आवाहन केले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांचे स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन प्रयत्नशील आहे. नुकतेच (Zilla Parishad) जिल्हा परिषदेतर्फे एकाच वेळी ३०,२६३ घरकुलांच्या भूमिपूजनाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाद्वारे लाभार्थ्यांच्या अडचणी समजून घेतल्या गेल्या आणि त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
क्रश सॅन्ड हा नैसर्गिक वाळूला पर्याय म्हणून वापरण्यात येतो. खडक फोडून तयार करण्यात आलेली ही कृत्रिम वाळू मजबूत काँक्रीट निर्मितीसाठी उपयुक्त आहे. बीम, कॉलम, स्लॅब, विट बांधणी व प्लास्टरिंगसाठी क्रश सॅन्ड प्रभावी ठरते. शिवाय, नैसर्गिक वाळूच्या उत्खननामुळे होणारे पर्यावरणीय नुकसान टाळण्यासाठीही हा उत्तम पर्याय मानला जातो. क्रश सॅन्ड स्थानिक पातळीवर तयार होत असल्याने वाहतूक खर्चही कमी होतो. सर्व गट विकास अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत पदाधिकारी आणि लाभार्थ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. घरकुल लाभार्थ्यांनी वाळूऐवजी क्रश सॅन्डचा वापर करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन आणि प्रकल्प संचालक गिरीश धायगुडे यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.