आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. ०४ एप्रिल २०२५) -
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने घुघुस येथे राज्यस्तरीय बुडो मार्शल आर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत मुंबई, पुणे, नाशिक, अमरावती आणि नागपूर या विभागांमधून सुमारे १०० विद्यार्थी सहभागी झाले. उत्कृष्ट कलेचे प्रदर्शन करत विविध खेळाडूंनी आपली चमक दाखवत राज्यस्तरावर आपल्या विभागाचा सन्मान वाढवला.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यहोवा यिरे फाऊंडेशनचे सीईओ डॉ. रमेशकुमार बोरकुटे सर होते. प्रमुख अतिथी म्हणून क्रीडा अधिकारी मोरेश्वर गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील, राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय ढोबळे आणि बुडो मार्शल आर्टचे प्रशिक्षक सिहान लहू पारवे, विवेक बोढे, सोमेश्वर येलचलवार, विनय बोढे आणि यहोवा यिरे फाऊंडेशनची अध्यक्षा कु. एलिजा बोरकुटे उपस्थित होते. स्पर्धेचे पंच म्हणून लहू पारवे, प्रवीण घुगे, सुरेश जाधव, सचिन पट्टेकर, अभिजित हरपळे, संतोष कुलकर्णी, शैलेश मोटघरे, राजेंद्र जंजाळे, अमोल युवनाते, प्राजक्ता सोनवणे आणि विशाल चव्हाण यांनी भूमिका बजावली.
या स्पर्धेत विपुल नेमराज कावडकर यांनी प्रथम स्थान मिळवले, आदित्य संदीप पाटील द्वितीय क्रमांकावर राहिले, तर जीत निलेश भोईर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे आयोजन बुडो मार्शल आर्टच्या जिल्हा प्रमुख ज्योती मानुसमारे यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी कोषाध्यक्ष राहुल गौरकार आणि सहसचिव सुबोध आलेवार यांनी विशेष योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.