आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जानेवारी २०२६) -
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मारडा (लहान) गावात निःशुल्क आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे नेतृत्व रामपूर गावातील सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे तसेच सामाजिक कार्यकर्ते समाधान कोरडे यांनी केले. ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते.
या आरोग्य शिबिरामध्ये बीपी, शुगर, थायरॉईड, रक्त तपासणी तसेच विविध आजारांचे परीक्षण करून नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले. आरोग्य तपासणीदरम्यान आजारांची प्राथमिक लक्षणे ओळखून पुढील उपचारांसाठी नागरिकांना योग्य सल्ला देण्यात आला. या शिबिराचा सुमारे ६० नागरिकांनी लाभ घेतला.
आरोग्य शिबिरात डॉक्टर मिलिंद जीवने, रुचिता दसुदे, नितीन खोब्रागडे तसेच परिचारिका वर्षा निमकर यांनी तपासणी व मार्गदर्शनासाठी मोलाचे सहकार्य केले. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या आरोग्य तपासणी शिबिरांची गरज लक्षात घेता डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी सुमित नले, गणेश थेरे, अभिलाश देवालकर, विपिन टांगे, गोपाल निब्रड, अतुल आगलावे, पंकज थेरे, देवानंद देरकर, अमोल निब्रड, दीपक वनकर, बबन देवतले यांनी परिश्रम घेतले. स्वयंसेवकांच्या संघटित प्रयत्नामुळे शिबिर नियोजनबद्ध आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले.
रामपूर गावातील सरपंच निकिता रमेशभाऊ झाडे तसेच शिवसेना तालुका प्रमुख रमेशभाऊ झाडे यांच्या नेतृत्वात परिसरात ग्रामीण जनतेच्या आरोग्य, सामाजिक समस्या, सहकार्य आणि जनहिताशी संबंधित विविध उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे ग्रामीण भागात नवचैतन्य निर्माण झाले असून जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. या जनसेवेच्या कार्याला सामाजिक कार्यकर्ते समाधान कोरडे यांची साथ लाभल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही भूमिका ग्रामीण भागात अधिक भक्कमपणे रुजत असल्याचे चित्र दिसून येत आहे. आरोग्य, समाजहित आणि लोककल्याणाला प्राधान्य देणारे असे उपक्रम राजकारणाला सकारात्मक दिशा देणारे ठरत आहेत.
#FreeHealthCamp #BalasahebThackerayJayanti #ShivSenaUBT #RuralHealthcare #HealthForAll #GrassrootsLeadership #CommunityHealth #sarpanch #rampur #samadhankorde #nititarameshzade #nitikazade #rameshzade #PublicService #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.