Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: सी.डी.सी.सी. बँकेकडून राजूरा येथे ट्रॅक्टर कर्जाचे वितरण
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सी.डी.सी.सी. बँकेचा पुढाकार सुदर्शन निमकर यांच्या हस्ते ८.५० लाखांच्या ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द आमचा विदर्भ - अन...
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सी.डी.सी.सी. बँकेचा पुढाकार
सुदर्शन निमकर यांच्या हस्ते ८.५० लाखांच्या ट्रॅक्टरच्या चाव्या सुपूर्द
आमचा विदर्भ - अनंता गोखरे 
राजुरा (दि. २५ जानेवारी २०२६) -
       सी.डी.सी.सी. बँक चंद्रपूरच्या राजूरा शाखेअंतर्गत शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या कर्ज योजनांचा लाभ प्रत्यक्षात मिळू लागल्याचे चित्र राजूरा येथे पाहायला मिळाले. बँकेच्या धोरणात्मक निर्णयानुसार सुरू करण्यात आलेल्या चारचाकी वाहन कर्ज योजनेअंतर्गत युवा शेतकऱ्यास ट्रॅक्टर कर्जाचे वितरण करण्यात आले.

        सी.डी.सी.सी. बँक चंद्रपूरच्या राजूरा शाखे अंतर्गत कृ.उ.बा. समितीचे संचालक तथा कढोली येथील युवा शेतकरी यांना आठ लाख पन्नास हजार रुपयांचे ट्रॅक्टर कर्ज मंजूर करण्यात आले. सदर ट्रॅक्टरच्या चाव्यांचे वितरण माजी आमदार तथा जिल्हा बँकेच्या राजूरा विभागीय कर्ज समितीचे अध्यक्ष सुदर्शन निमकर यांच्या हस्ते २३ जानेवारी रोजी करण्यात आले. हा कर्ज वितरण कार्यक्रम सी.डी.सी.सी. बँकेच्या विभागीय कार्यालय राजूरा येथे पार पडला. या कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बँक सातत्याने कार्यरत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. आधुनिक शेतीसाठी यांत्रिकीकरण आवश्यक असून अशा कर्ज योजनांमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

         कार्यक्रमाला विभागीय अधिकारी बी. एल. जोगी, कृ.उ.बा. समितीचे उपसभापती संजय पावडे, संचालक अॅड. अरुण धोटे, संचालक नवनाथ पिंगे, आदर्श ग्रामपंचायत कळमना सरपंच नंदकिशोर वाढई, आर्वी ग्रामपंचायत माजी सरपंच सुधाकर महाकुलकर, शाखाधिकारी नन्नावरे यांच्यासह बँकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कर्ज वितरणामुळे शेतकऱ्यांना शेतीकामासाठी आधुनिक साधने उपलब्ध होत असून उत्पादन वाढीस चालना मिळणार आहे. सी.डी.सी.सी. बँकेच्या या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत असल्याची भावना यावेळी उपस्थित शेतकऱ्यांमध्ये व्यक्त करण्यात आली.

#CDCCBank #sudarshannimkar #Rajura #FarmerEmpowerment #TractorLoan #AgricultureDevelopment #RuralGrowth #BankingSupport #FarmerFirst #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top