आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २५ जानेवारी २०२६) -
लोकशाही बळकट करण्यासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असून मतदार जनजागृतीत विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतल्याचे प्रेरणादायी चित्र विरुर येथे पाहायला मिळाले. १६ व्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राजुरा तालुक्यातील विरुर येथील इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी लोकशाही बळकट करण्यासाठी विविध उपक्रम राबवत प्रभावी जनजागृती केली.
तहसीलदार ओमप्रकाश गोंड, महसूल विभाग राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली २३ जानेवारी रोजी इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी शपथ देण्यात आली. याच अनुषंगाने बस स्टँड चौक व शिवाजी चौक येथे रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेचे निरीक्षण करून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन बक्षीस वितरण करण्यात आले.
२४ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता बस स्टँड चौकापासून विरुर गावातील मुख्य रस्त्याने इंदिरा गांधी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय व इंदिरा गांधी इंग्लिश प्रायमरी स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत प्रभात फेरी काढण्यात आली. या रॅलीच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
प्रभात फेरीदरम्यान निर्भय होऊन मतदान करा, अधिकाराचा सन्मान करा, आपली जबाबदारी आपला अधिकार भारतीय लोकशाहीचा आधार, मतदानाचा अभिमान हीच लोकशाहीची शान, आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे, चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया अशा प्रभावी घोषवाक्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करत लोकशाही मूल्यांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
या उपक्रमात प्राचार्य रेणुका कुंभारे, प्राध्यापक रवीकुमार देवेकर, प्राध्यापक सुनील गौरकार, प्राध्यापक अनिल कौरासे, प्राध्यापक शुभम जुनगरे, प्राध्यापिका वनिता पेरगुलवार, प्राध्यापिका मनीषा ढवस, प्राध्यापिका स्नेहल बोबाटे, प्राध्यापिका ममता वांढरे, प्राध्यापिका स्नेहल वरवाडे, प्राध्यापिका बालिका चांदेकर, प्राध्यापिका रोहिणी पाला, प्राध्यापक खुशाल वांढरे, प्राध्यापक गजानन ढवस, प्राध्यापक राकेश ताकसांडे, प्राध्यापिका उमा धोंगळे यांची उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे लोकशाही मूल्यांची जाणीव समाजात रुजवण्याचे कार्य यशस्वीरीत्या पार पडले असून विरुर गावात राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा झाल्याची चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.
#NationalVotersDay #DemocracyStrong #VoteAwareness #StudentInitiative #VoterEducation #YouthForDemocracy #Rajura #wirur station #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.