Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी - आमदार सुधीर मुनगंटीवार
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी - आमदार सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10 नवीन एसटी बसेस मंजूर पहिल्या टप्प्यात 5 बसेसचे...
एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी - आमदार सुधीर मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यासाठी 10 नवीन एसटी बसेस मंजूर
पहिल्या टप्प्यात 5 बसेसचे लोकार्पण
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 03 एप्रिल 2025) -
        चंद्रपूर जिल्ह्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून 10 नवीन एसटी बसेस मंजूर करण्यात आल्या असून, पहिल्या टप्प्यात 5 बसेसचे लोकार्पण करण्यात आले. या प्रसंगी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एसटी ही गरीब आणि मध्यमवर्गीयांची जीवनदायिनी असल्याचे प्रतिपादन केले. चंद्रपूर बसस्थानक येथे पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्यात आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते नव्या बसेसना हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या वेळी परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        या वेळी बोलताना आमदार मुनगंटीवार म्हणाले, "मी अर्थमंत्री असताना एसटी महामंडळासाठी सर्वाधिक निधी मंजूर केला होता. श्रीमंत माणूस स्वतःच्या वाहनाने प्रवास करू शकतो, पण गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी एसटी हा प्रवासाचा महत्त्वाचा आधार आहे. एसटी महामंडळाने कायमच प्रवाशांच्या सुख-दुःखात भाग घेतला आहे." त्यांनी पुढे सांगितले की, चंद्रपूर, बल्लारपूर आणि मुल बसस्थानकांसह राज्यातील अनेक बसस्थानकांच्या नूतनीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. याशिवाय, महिला प्रवाशांसाठी ‘तेजस्विनी’ वातानुकूलित बसेस सुरू करण्याचा निर्णयही घेतला गेला.

चंद्रपूर जिल्ह्यासाठी 200 नवीन बसेस मंजूर
        चंद्रपूर जिल्ह्यासाठी एकूण 200 नवीन बसेस मंजूर करण्यात आल्या असून, त्यापैकी 100 बसेस आधीच उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित 100 बसेस लवकरच चंद्रपूर जिल्ह्यात दाखल होतील. या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक लवकरच चंद्रपूर जिल्ह्याला भेट देणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत स्थानिक वाहनचालकांच्या नियुक्त्या, निवास व्यवस्थापन आणि नव्या बस डेपो उभारणीसंदर्भात चर्चा होईल. मुल येथे स्वतंत्र बस डेपो उभारण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी आवश्यक पावले उचलली जात असल्याची माहितीही आमदार मुनगंटीवार यांनी दिली. त्यांनी आश्वासन दिले की, एसटी महामंडळाची सेवा अधिक सक्षम व प्रवाशांसाठी सोयीस्कर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार मुनगंटीवार यांनी बसस्थानकातील विविध स्टॉलला भेटी दिल्या आणि शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी विद्यार्थ्यांनी बससेवेच्या संदर्भात आपले अनुभव आणि समस्या मांडल्या.

        या कार्यक्रमास चंद्रपूर विभाग नियंत्रक स्मिता सुतावणे, विभागीय वाहतूक अधिकारी पुरुषोत्तम व्यवहारे, आगार व्यवस्थापक अंकुश खाडिलकर, विभागीय अभियंता ऋषिकेश होले, बसस्थानक प्रमुख हेमंत गोवर्धन, कार्यशाळा अधीक्षक मनोज डोंगरकर, वाहतूक निरीक्षक अंकित कामतवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक प्रकाश तोडकर, बंडू गौरकार आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top