Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Theft cases exposed दोन चोरी प्रकरणे उघडकीस; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Theft cases exposed दोन चोरी प्रकरणे उघडकीस; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त आमचा विदर्भ -  अनंता गोखरे जिवती (दि. 08 एप्रिल 2025) - जिवती पोलीस ...
Theft cases exposed
दोन चोरी प्रकरणे उघडकीस; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ -  अनंता गोखरे
जिवती (दि. 08 एप्रिल 2025) -
जिवती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दोन चोरीच्या प्रकरणांचा यशस्वी छडा लावत पोलिसांनी दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात विधी संघर्षग्रस्त बालकाला (वय १७ वर्ष ५ महिने) ताब्यात घेण्यात आले असून त्याने दोन्ही चोरीची कबुली दिली आहे. पहिल्या प्रकरणात, शामकाबाई राजेश चव्हाण (वय ३०) रा. देवलागुडा या घराला कुलूप लावून लाकडे आणण्यासाठी गेल्या असता अज्ञात चोरट्याने घराचे दरवाजाचे कुलूप तोडून २०,००० रुपये रोख रक्कम व १२ तोळे चांदीचे दागिने (किंमत ५,००० रुपये) असा ऐवज चोरून नेला होता. (police station jiwati)

दुसऱ्या प्रकरणात, रमेश नारायण जाधव (वय ३३) हे आपल्या मूळ गावी होळी सणासाठी गेले असताना चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप फोडून ५२,००० रुपये रोख, तसेच २ सोन्याच्या अंगठ्या (प्रत्येकी ५ ग्रॅम) व १ अंगठी (१० ग्रॅम) असा एकूण १,५०,००० रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला होता. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक कांचन पांडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा व त्यांच्या पथकाने केला.

संशयित विधी संघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्याकडून एकूण १,५५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोन्ही गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश वाडीवा करीत असून स्थानिक नागरिकांकडून पोलीस पथकाच्या कामगिरीचे कौतुक करण्यात येत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top