Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Illegal mining अवैध उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Illegal mining अवैध उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई 6 हायवा आणि पोकलेन जप्त आमचा विदर्भ -  दीपक शर्मा कोरपना (दि. 08 एप्रिल 2025) -    ...
Illegal mining
अवैध उत्खननावर महसूल विभागाची मोठी कारवाई
6 हायवा आणि पोकलेन जप्त
आमचा विदर्भ -  दीपक शर्मा
कोरपना (दि. 08 एप्रिल 2025) -
        (National Highway No. 353B) राज्यसीमा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 बी च्या रस्ते बांधकामासाठी (Korpana Taluka) कोरपना तालुक्यातील (Dhanoli village) धानोली गावाजवळील (devghat nala) देवघाट नाल्यात रविवार, 6 एप्रिल रोजी रात्री मोठ्या प्रमाणावर अवैध दगड व मुरूम उत्खनन (Illegal stone and Murum mining) सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर (Revenue Department) महसूल विभागाने धडक कारवाई केली. या कारवाईत सहा हायवा ट्रक आणि एक पोकलेन मशीन जप्त करण्यात आले. ही कारवाई रात्री सुमारे 10 वाजता करण्यात आली, जेव्हा एक पोकलेन मशीनद्वारे खोदकाम करत मोठ्या प्रमाणावर मुरूम आणि दगड भरलेले ट्रक बाहेर पडत होते. गुप्त माहितीच्या आधारे नायब तहसीलदार चिडे, तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या पथकाने देवघाट नाल्यावर छापा मारून सदर वाहने ताब्यात घेतली. ट्रक तहसील कार्यालय (Tehsil Office korpana) परिसरात जमा करण्यात आले असून पोकलेन मशीन गावातील पोलीस पाटलांच्या सुपुर्दकीवर ठेवण्यात आले आहे. राजुरा सीमावर्ती महामार्गाचे काम गेल्या 2 वर्षांपासून सुरू असून, संबंधित बांधकाम कंपनीकडून शासनाच्या स्पष्ट आदेशांना व उत्खनन नियमावलीला वारंवार धाब्यावर बसवले जात आहे. रात्री उत्खननास बंदी असतानाही, नाल्यातून बेसुमार लुट सुरू असल्याचे बोलले जात आहे. 

आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई
        महसूल विभागाने केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. यापूर्वीही काहीवेळा कारवाई झाली असली तरी कंपनीकडून पुन्हा बेकायदेशीर उत्खनन सुरू केले जात होते. सदर प्रकरण तहसीलदार पल्लवी आखाडे यांच्या समोर सादर करण्यात आले असून, त्यांनी वाहनधारकांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले आहेत. आता प्रशासन या प्रकरणी पुढे कितपत कठोर पावले उचलते आणि या बेकायदेशीर उत्खननावर खरोखरच लगाम बसतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (tahasildar korpana)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top