Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Student sit-in protest देवाडा येथील एकलव्य शाळेतील विद्यार्थिनींचे धरणे आंदोलन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Student sit-in protest देवाडा येथील एकलव्य शाळेतील विद्यार्थिनींचे धरणे आंदोलन प्राचार्य संजय बोंतावार यांची कायम नियुक्ती करण्याची मागणी आम...
Student sit-in protest
देवाडा येथील एकलव्य शाळेतील विद्यार्थिनींचे धरणे आंदोलन
प्राचार्य संजय बोंतावार यांची कायम नियुक्ती करण्याची मागणी
आमचा विदर्भ -  दीपक शर्मा
राजुरा (दि. 08 एप्रिल 2025) -
        राजुरा तालुक्यातील देवाडा येथील एकलव्य रेसिडेन्शियल स्कूलमधील प्राचार्य प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले असून, प्राचार्य संजय बोंतावार यांना पुन्हा कायम नियुक्ती द्यावी, यासाठी विद्यार्थिनींनी सोमवार 6 एप्रिल रोजी शाळा प्रांगणातच भर उन्हात धरणे आंदोलन छेडले. (Eklavya Residential School Dewada)

विद्यार्थिनींची एकमुखी मागणी – "आम्हाला संजय सरच हवेत!"
        (Student) विद्यार्थिनींची ठाम मागणी आहे की, संजय बोंतावार हे शिस्तप्रिय, कार्यक्षम व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सतत प्रयत्नशील असलेले प्राचार्य आहेत. त्यांच्या कार्यशैलीमुळे शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावला असून, त्यांचीच कायम नियुक्ती व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. (Principal Sanjay Bontawar)

विवादित तक्रारीमुळे प्राचार्याची बदली
        प्राचार्य संजय बोंतावार यांच्याविरोधात शाळेतील एका शिक्षिकेने विनयभंगाची तक्रार दाखल केली होती, त्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. मात्र शाळा व्यवस्थापन समिती व विद्यार्थ्यांच्या मते, सदर तक्रार ही खोटी, आधारहीन आणि आकसापोटी केलेली असून, यामागे शिस्तप्रिय प्राचार्यांना अडचणीत आणण्याचा हेतू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने देखील या आंदोलनाला पाठिंबा दर्शवून, प्राचार्य बोंतावार यांच्यावर असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी राबवलेले उपक्रम, शिस्त, आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठीचा त्यांचा दृष्टिकोन कौतुकास्पद असल्याचे समितीने नमूद केले. आता आदिवासी विभाग व प्रकल्प अधिकारी या प्रकरणात काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. विद्यार्थी, पालक व शाळा व्यवस्थापन समितीने सत्य आणि योग्य निर्णयासाठी आवाज बुलंद केला असून, येणाऱ्या काळात या आंदोलनाला आणखी व्यापक स्वरूप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Protest in the heat of the day)

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top