Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Illegal tobacco smuggling अवैध तंबाखू तस्करीचा पर्दाफाश
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Illegal tobacco smuggling अवैध तंबाखू तस्करीचा पर्दाफाश पाच लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि....
Illegal tobacco smuggling
अवैध तंबाखू तस्करीचा पर्दाफाश
पाच लाखांहून अधिक किमतीचा सुगंधित तंबाखू जप्त
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. 08 एप्रिल 2025) -
        पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन चंद्रपूर यांच्या आदेशानुसार चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात सुरु असलेल्या मोहीमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या (Local Crime Branch Chandrapur) पथकाने मोठी कारवाई केली आहे. बल्लारपूर तालुक्यातील मानोरा गावातील एका किरायाच्या गोडाऊनवर छापा टाकून 5 लाख 06 हजार  910 रुपये किमतीचा सुगंधित तंबाखू (Aromatic tobacco) जप्त करण्यात आला आहे. (Ballarpur) (Manora)

        पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी करण्यात आलेल्या या कारवाईत ईगल होका सुगंधित तंबाखू, ओला होका संभाजी सुगंधित तंबाखू, मज़ा 108 सुगंधित तंबाखू असा 5 लाख 06 हजार  910 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, हा साठा हरीश अंबादास ठक्कर रा. बल्लारशा याने मानोरा गावात एका किरायाच्या गोडाऊनमध्ये बेकायदेशीररीत्या ठेवला होता. सदर घटनेप्रकरणी आरोपी हरीश ठक्कर याच्याविरुद्ध पोलीस स्टेशन बल्लारशा (Police Station Ballarsha) येथे अन्नसुरक्षा व मानके अधिनियम (Food Safety and Standards Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक सुदर्शन अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले, मधुकर चंद्रया सामलवार, धनराज करकाडे, सुरेंद्र महतो, चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे, मिलिंद टेकाम स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर येथील अधिकारी व कर्मचारी यांनी केली. पोलीस विभागाकडून अशा अवैध तस्करी व साठ्यांविरोधात कारवाई सुरूच राहणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top