IPL Online betting
MIDC राजुरा येथे IPL ऑनलाईन सट्टा बेटिंगवर पोलिसांचा छापा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 08 एप्रिल 2025) -
राजुरा पोलीस स्टेशन हद्दीतील (MIDC Bamanwada) मौजा बामणवाडा येथील विहान रेस्टॉरंटच्या मागील एम.आय.डी.सी परिसरात ऑनलाईन क्रिकेट सट्ट्याचा पर्दाफाश (Online cricket betting exposed) करण्यात आला आहे. दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून सुमारे १७ लाख २० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. (police station rajura)
प्रकरणी पोलिसांनी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी (MH 26 6979) – अंदाजित किंमत 15 लाख, मोबाईल फोन्स – Samsung Galaxy S24 Ultra, iPhone 13 Pro Max, Vivo V30, Vivo V2319 – एकूण किंमत 2 लाख 20 वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी आरोपी आकाश उर्फ चिंना अंदेवर (वय 36) – GN कॉलेज समोर, बामणी, बल्लारपूर, जि. चंद्रपूर, शुभम खांडरे (वय 29) – बामणी फाटा, वणी, जि. यवतमाळ, सागर रमेश गोलाईत (वय 35) – अण्णाभाऊ साठे चौक, वणी, जि. यवतमाळ, उमेश किशोरचंद राय (वय 35) – महादेव नगरी, चिखलगाव, वणी, जि. यवतमाळ या अटक केली.
या आरोपींनी मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु या आयपीएल 2025 क्रिकेट सामन्यावर मोबाईलद्वारे ऑनलाईन सट्टा लावताना पोलिसांच्या हाती लागले. स्कॉर्पिओ गाडीत बसून सट्टा खेळत असलेल्या या आरोपींवर अप. क्र. 165/2025, कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा व सहकलम 49 भादंवि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे (Aniket Hird) (IPS) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनी रमेश नन्नावरे, स.फौ. किशोर तुमराम, पो.अं. शरद राठोड, पो.अं. महेश बोलगोडवार, पो.अं. योगेश पिदुरकर यांच्या सहकार्याने केली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा गैरकायदेशीर कृत्यांविरोधात तत्काळ माहिती द्यावी, जेणेकरून समाजात शिस्त व कायद्याचे पालन होईल.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.