गांजा विक्रीप्रकरणी दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 11 एप्रिल 2025) -
राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गांज्याच्या विक्रीचा पर्दाफाश करत पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. गुप्त माहितीच्या आधारे पोलीसांनी केलेल्या कारवाईत एकूण 5,500 रुपये किमतीचा गांजा व त्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे. गणपत उर्फ गंप्या बावणकर वय 30 वर्षे, वसंतराव बावणकर वय 56 वर्षे दोघेही रा. सोनीयानगर याना अटक करण्यात आली असून यांचे विरुद्ध गुन्हा क्रमांक 174/2025 अन्वये एन.डी.पी.एस. कायद्याच्या कलम 8 (क), 20 (ब) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.
दिनांक 10 एप्रिल 2025 रोजी राजुरा पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की गणपत बावणकर नामक इसम आपल्या घरी गांजा बाळगून त्याची विक्री करत आहे. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित कारवाई करत घराची झडती घेतली असता, घराच्या छतामध्ये लपवून ठेवलेल्या पिशवीत गांजासदृश्य अंमलीपदार्थ सापडला.
जप्त मुद्देमाल:
- एक कापडी पिशवीत गांजा सदृश्य अंमलीपदार्थ (194ग्रॅम) – अंदाजे किंमत 5,000
- गांज्याची विक्री करण्यासाठी वापरण्यात आलेल्या ४ पारदर्शक प्लास्टिक पिशव्या (24 ग्रॅम) – 400
- 10 जिप असलेल्या पारदर्शक पिशव्या – 100
- एकूण मुद्देमाल किंमत: 5,500
सदरची कारवाई परिविक्षाधीन सहाय्यक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे, पोउपनि पांडूरंग हाके, पोउपनि भिष्मराज सोरते, सफौ किशोर तुमराम, पोहवा विकी निर्वाण, पो.अं अविनाश बांबोळे, पो.अं महेश बोलगोडवार, पो.अं शफीक शेख, पो.अं आनंद मोरे, पो.आ शरद राठोड, व पो.आ तिरुपती जाधव यांनी संयुक्तरित्या ही यशस्वी कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.