Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "महाराष्ट्राच्या मातीत रोजगारासाठी मराठी माणसालाच प्राधान्य द्या!"
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"महाराष्ट्राच्या मातीत रोजगारासाठी मराठी माणसालाच प्राधान्य द्या!" "स्थानिकांसाठी रोजगाराची लढाई - मनसेचा बुद्धा कंपनीला इशार...
"महाराष्ट्राच्या मातीत रोजगारासाठी मराठी माणसालाच प्राधान्य द्या!"
"स्थानिकांसाठी रोजगाराची लढाई - मनसेचा बुद्धा कंपनीला इशारा!"
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 11 एप्रिल 2025) -
राजुरा तालुक्यातील गौरी पवनी कोळसा खाणीत बुद्धा कंपनी कार्यरत असून, त्या कंपनीत स्थानिक युवकांना डावलून बाहेर राज्यातील मजुरांना भरती केल्याचा आरोप होत आहे. महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार 80 टक्के रोजगार स्थानिकांना देणे बंधनकारक असताना, कंपनी व्यवस्थापनाने हा नियम धाब्यावर बसवला आहे. या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. काही बेरोजगार युवकांच्या तक्रारीनंतर त्यांनी थेट बुद्धा कंपनी गाठली आणि सात दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे.

मनसेच्या प्रमुख मागणी:
  • स्थानिक बेरोजगार युवकांना तत्काळ रोजगार द्यावा
  • शासनाच्या GR नुसार योग्य मजुरी द्यावी
  • कामकाज मराठी भाषेतच व्हावे
"जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि कायदा-सुव्यवस्थेचा भंग झाल्यास जबाबदारी कंपनीची असेल," असे चंदनखेडे यांनी स्पष्ट केले. या वेळी मनसेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार, प्रवीण शेवते, कृष्णा गुप्ता, शंकर भडके, प्रशांत रामटेके आणि इतर मनसैनिक उपस्थित होते.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top