Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांची जयंती उत्साहात साजरी
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांची जयंती उत्साहात साजरी आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. 10 एप्रिल 2025) -         जागतिक होमिओप...
होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांची जयंती उत्साहात साजरी
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 10 एप्रिल 2025) -
        जागतिक होमिओपॅथी दिवस व होमिओपॅथीचे जनक सर डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांची 270 वी जयंती राजुरा येथील मारुती क्लिनिक येथे साजरी करण्यात आली. या विशेष प्रसंगी होमिओपॅथी क्षेत्रातील मान्यवर डॉक्टरांनी उपस्थित राहून डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांना अभिवादन केले. कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर सॅम्युअल हॅनिमॅन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करून करण्यात आली. राजुरातील सुप्रसिद्ध जेष्ठ डॉ. चंद्रशेखर गोवारदिपे, डॉ. चंद्रकांत कुलटे, डॉ. गणेश जिद्देवार, गोरे, रितेश डाखरे, डॉ. दुष्यन्त मोरे यांनी पुष्पमाला अर्पण केली.

        या कार्यक्रमात डॉ. सॅम्युअल हॅनिमॅन यांचे जीवनकार्य आणि होमिओपॅथी चिकित्सा प्रणाली यावर सखोल माहिती दिली गेली. डॉ. हॅनिमॅन (जन्म: 10 एप्रिल 1755) हे जर्मनीतील सुप्रसिद्ध वैद्यकीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी 18व्या शतकात "Like cures Like" या तत्त्वावर आधारित होमिओपॅथी प्रणालीची स्थापना केली. त्यांचे संशोधन आणि योगदान आजही जगभरातील लाखो डॉक्टर आणि रुग्णांसाठी प्रेरणास्थान ठरते. या वेळी डॉ. अमोल कल्लुरवार, डॉ. कुणाल गोवरदीपे, डॉ. सुरेश पंदीलवार, डॉ. पराग डोर्लीकर, डॉ. अक्षय पादे यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला. कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नवोदित डॉक्टरांमध्ये जनजागृती आणि होमिओपॅथीच्या प्रभावीतेबाबत नवचैतन्य निर्माण करण्यात आले.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top