Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: ''श्रीरामाचे नाव, पण काम रामभरोसे''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
''श्रीरामाचे नाव, पण काम रामभरोसे'' श्रीराम नवमी गेली, पण स्वागतद्वार तसंच वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न! आमचा विदर्भ - दी...
''श्रीरामाचे नाव, पण काम रामभरोसे''
श्रीराम नवमी गेली, पण स्वागतद्वार तसंच
वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. २१ एप्रिल २०२५) -
        ६ एप्रिल रोजी संपूर्ण देशभरात श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राजुरामध्ये देखील श्रीराम भक्त, सामाजिक संस्था, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी होर्डिंग्स, बॅनर्स आणि स्वागतद्वार लावून नागरिकांना शुभेच्छा दिल्या. मात्र, याकरिता स्थानिक नगर परिषदेकडून रीतसर परवानगी घेणे बंधनकारक असूनसुद्धा, आज मितीला स्थानिक उपजिल्हा रुग्णालयासमोर आमदार देवराव भोंगळे यांचे फोटो असलेले श्रीराम नवमी निमित्य शुभेच्छा देणारे स्वागतद्वार मूळ ठिकाणीच असल्याचे दिसत आहे. विशेषतः जुन्या बसस्थानकाजवळ, उपजिल्हा रुग्णालयासमोर आसिफाबाद मार्गावर लावलेले स्वागतद्वार हे वाहतुकीस अडथळा ठरत असून, यामुळे अपघातास कारणीभूत ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, बसस्थानकाकडून येणाऱ्या दुचाकीस्वारांना संविधान चौकाकडून येणारी वाहने स्पष्ट दिसत नाहीत. अशा स्थितीत एखादा वाहनचालक रुग्णालयात जाण्यासाठी वळण घेत असताना अपघात घडू शकतो. नागरिक प्रश्न उपस्थित करत आहेत की, सामान्यांसाठी नियम वेगळे आणि सत्तेत असलेल्या राजकीय व्यक्तींसाठी वेगळे का? नगर परिषदेने परवानगीशिवाय किंवा कालावधी संपल्यावर असलेले फलक तत्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

        महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 नुसार, जितक्या दिवसाची मुदत देण्यात आली आहे तितक्या दिवस बॅनर, होर्डिंग्स व स्वागत द्वार ठेऊन नंतर काढून टाकावे तसेच परवानगीशिवाय लावलेले फलक, बॅनर किंवा स्वागतद्वारा वर तत्काळ कारवाई होणे अपेक्षित आहे. राज्यातील अनेक नगर परिषदा यावर कठोर पावले उचलत असताना, राजुरा मध्ये नगर परिषद प्रशासन का गप्प आहे, हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top