Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: "बल्लारपूरच्या रस्त्यांना मिळणार नवे आयुष्य''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"बल्लारपूरच्या रस्त्यांना मिळणार नवे आयुष्य'' मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद! आमचा विदर्भ - दीपक शर्...
"बल्लारपूरच्या रस्त्यांना मिळणार नवे आयुष्य''
मुनगंटीवार यांच्या पुढाकाराला गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद!
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. २१ एप्रिल २०२५) -
        बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षिततेसाठी विविध महत्त्वाच्या विकासकामांची मागणी घेऊन आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीत रस्ते, पूल आणि उड्डाणपुलांबाबत महत्वाच्या कामांची यादी सादर करण्यात आली असून, गडकरींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

       आ. मुनगंटीवार यांनी या निवेदनात अनेक राहदारीस अडथळा ठरणाऱ्या व अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यामध्ये मूल शहराजवळील रेल्वे ओव्हर ब्रिज, बल्लारपूर-आष्टी मार्गावरील 2 किमी अपूर्ण रस्ता, राष्ट्रीय महामार्ग 930च्या दुतर्फा आरसीसी ड्रेनेज, तसेच नवे उड्डाणपूल आणि पूल यांचा समावेश आहे. विशेषतः कोठारी गावाजवळील 2 किमी अपूर्ण रस्त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मोठे खड्डे, अपघात आणि वाहतूक अडथळ्यामुळे या मार्गाचे काम तातडीने पूर्ण करणे अत्यावश्यक असल्याचे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले. तसेच, रेल्वे क्रॉसिंगमुळे होणाऱ्या वाहतूक खोळंब्याच्या पार्श्वभूमीवर मुल शहराजवळ रेल्वे ओव्हर ब्रिज बांधण्याची मागणी केली गेली. दर अर्ध्या तासाला बंद होणाऱ्या फाटकांमुळे रुग्ण, विद्यार्थ्यांना व सर्वसामान्यांना अडचणी निर्माण होत आहेत.

        या बैठकीत 48 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव नागपूरच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण कार्यालयास दिला गेला आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना काँक्रीट ड्रेनेज, पूल बांधकाम, आणि औद्योगिकीकरणामुळे वाढलेल्या रहदारीसाठी उड्डाणपुलांची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. गोंडसावरी, आगडी, जानाळा, वलनी, लोहारा यांसारख्या गावांमध्ये नाल्याच्या खराब अवस्थेमुळे आरोग्यधोके निर्माण झाले असून, त्या दुरुस्तीसाठी तातडीने मंजुरी द्यावी, अशी विनंतीही करण्यात आली. पोंभुर्णा, बल्लारपूर व मुल तालुक्यांमध्ये नव्या उड्डाणपुलांची आणि पूल संरचनेची मागणी करताना, आ. मुनगंटीवार यांनी सांगितले की, वाढत्या रहदारीमुळे स्थानिकांना सुरक्षित, सुलभ वाहतूक व्यवस्था आवश्यक आहे.

        केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सर्व मागण्यांचा आढावा घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून, विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top