Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: आजपासून श्री महाकाली माता यात्रेला सुरुवात
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
आजपासून श्री महाकाली माता यात्रेला सुरुवात मराठवाडा आणि आंध्रप्रदेशातील हजारो भाविक सहभागी होणार भाविकांसाठी सुविधा आणि सुरक्षा आराखडा जाहीर...
आजपासून श्री महाकाली माता यात्रेला सुरुवात
मराठवाडा आणि आंध्रप्रदेशातील हजारो भाविक सहभागी होणार
भाविकांसाठी सुविधा आणि सुरक्षा आराखडा जाहीर
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. ०३ एप्रिल २०२५) -
        यंदा श्री महाकाली माता यात्रा दिनांक ३ एप्रिल पासून सुरू होत आहे. यात्रेचा मुख्य दिवस हनुमान जयंती, १२ एप्रिल असणार आहे. संपूर्ण यात्रा सुमारे एक महिना चालणार असून, महाराष्ट्रासह मराठवाडा आणि आंध्रप्रदेशातील हजारो भाविक यंदाही या पवित्र यात्रेत सहभागी होणार आहेत. (shri mahakali mata mandir chandrapur)

भाविकांसाठी निवास व्यवस्था
  • मंदिराच्या धर्मशाळेसमोर आणि मागील भागात लोखंडी शेड उभारण्यात आले आहेत.
  • महाकाली स्टेडियममध्ये १८,००० चौरस फूट कापडी मंडप उभारला जाईल.
  • स्टेडियमवरील पाण्याच्या टाकीजवळ ५,००० चौरस फूट लोखंडी शेड तयार केला आहे.
  • अंचलेश्वर मंदिर परिसर आणि बैल बाजार मैदानावर यात्रेकरूंसाठी अतिरिक्त मंडपांची व्यवस्था असेल.
  • मंदिर परिसरात २४ तास पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध असेल.
दर्शन रांग व्यवस्थापन
  • मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापासून दर्शन रांगेसाठी लोखंडी बॅरिकेड्स आणि मंडप उभारले जातील.
  • हनुमान आणि गणेश मंदिराजवळ लोखंडी पूल उभारण्यात येईल.
  • गर्दीच्या नियोजनासाठी अतिरिक्त दर्शन रांग राखीव असेल.
  • लोखंडी रेलिंग, पंखे आणि फॉगिंग सिस्टीम बसविण्यात येईल.
  • जेष्ठ नागरिक आणि अपंग भाविकांसाठी विशेष दर्शन सोय करण्यात आली आहे.
पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
  • ४,००० लिटर क्षमतेचा वॉटर कूलिंग प्लांट व २० नळ बसविण्यात येणार.
  • ७५,००० लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाकीवरून अतिरिक्त १० नळ उपलब्ध.
  • झरपट नदी काठावर शासनाने बंधारे बांधले असून, भाविकांसाठी सुविधा राहील.
सुरक्षा आणि वैद्यकीय सेवा
  • मंदिर, धर्मशाळा आणि दर्शन रांग परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील.
  • पोलीस चौकी, माईक सिस्टीम आणि ३० लाऊडस्पीकरची व्यवस्था.
  • २४ तास कार्यरत असलेली आरोग्यसेवा आणि औषधसाठा उपलब्ध असेल.
  • १५ अग्निशमन सिलेंडर ठेवण्यात आले असून, गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त गेटची सोय.
  • ३० खाजगी सुरक्षा रक्षक आणि १०० स्वयंसेवक तैनात असतील.
महाप्रसाद वितरण आणि स्वच्छता व्यवस्थापन
  • वेगळ्या शेडमध्ये महाप्रसादाचे आयोजन.
  • विविध सेवाभावी संस्थांमार्फत महाप्रसाद वितरण.
  • मंदिर व दर्शन रांगेत कचरा कुंड्या ठेवण्यात येतील.
  • विद्युत व्यवस्थेची तपासणी आणि सुरक्षित जोडणी करण्यात येईल.
अन्य सुविधा
  • मंदिर धर्मशाळेत स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सोय.
  • आपत्तीच्या वेळी शाळा आणि हॉल व्यवस्था करण्यासाठी महानगरपालिकेची मदत अपेक्षित.
        यात्रेच्या सुरळीत आयोजनासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन श्री महाकाली देवस्थान व प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top