Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: संविधानिक हक्क आणि आरोग्याविषयी महिलांना मार्गदर्शन
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
चंद्रपूरमध्ये महिला प्रबोधन मेळावा संपन्न आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दि. १२ मार्च २०२६) -         ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमि...
चंद्रपूरमध्ये महिला प्रबोधन मेळावा संपन्न
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दि. १२ मार्च २०२६) -
        ८ मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आदिवासी टायगर सेना यांच्या वतीने एक दिवसीय महिला प्रबोधन मेळावा व महिला सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे आयोजित या कार्यक्रमात महिलांच्या हक्क, आरोग्य, शिक्षण आणि संविधानिक अधिकारांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

        कार्यक्रमाची सुरुवात इतिहासातील कर्तृत्ववान महान महिलांच्या प्रतिमेला अभिवादन व पूजन करून करण्यात आली. समाजातील महिलांनी विविध क्षेत्रात काम करताना आपल्याला मिळालेला ऐतिहासिक वारसा जपला पाहिजे, तसेच पुढील पिढीसाठी प्रेरणादायी कार्य केले पाहिजे, असे विचार वक्त्यांनी व्यक्त केले. यावेळी संविधानातील विविध कायदे महिलांना संरक्षण, स्वातंत्र्य, सन्मान, न्याय व अधिकार प्रदान करतात याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच आदिवासी महिलांसाठी आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. महिलांना होणारे आजार, त्यावरील उपचार, आरोग्य जनजागृती आणि शिक्षणाचे महत्त्व यावरही मार्गदर्शन करण्यात आले.

        मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विदर्भ महासचिव योगिता शेडमाके होत्या. उद्घाटक म्हणून विदर्भ कार्याध्यक्षा मीनल आत्राम उपस्थित होत्या. मुख्य मार्गदर्शक म्हणून सामाजिक विचारवंत कविता गेडाम, प्रकल्प कार्यालय चंद्रपूर येथील सरिता सोयाम, ठाणेदार लताताई वाडीवे, समन्वयक चंद्रपूर निशा प्रगती प्रभुदास उदस यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे म्हणून विदर्भ महिला पदाधिकारी वर्षा परचाके, सुमित्रा आलाम, रंजना आत्राम, दीपा कुलमेथे, पुष्पा मेश्राम, वर्षा आत्राम आणि रेखा कुमरे प्रामुख्याने उपस्थित होत्या.

        मेळाव्यात सहभागी झालेल्या महिलांचा पेन, पुष्पगुच्छ आणि पिवळा शेला देऊन सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित महिलांना आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आदिवासी टायगर सेना जिल्हा शाखा चंद्रपूरच्या प्रतिज्ञा किन्हाके, योजना किन्हाके, पूजा कुरसंगे, संगीता सिडाम, सोज्वळ कुमरे, रेखा सोरते, पौर्णिमा आत्राम, रिता मडावी, रजनी आलाम, निशा मडावी, राजेश्वरी कुमरे, वंदना उईके, उज्ज्वला उईके, पुष्पा सोयाम आणि नलिनी गेडाम यांनी विशेष परिश्रम घेतले.

        महिला प्रबोधन मेळाव्याचे संचालन विदर्भ प्रवक्त्या मनीषा मडावी यांनी केले. प्रस्ताविक वर्षा परचाके यांनी मांडले तर आभार प्रदर्शन वर्षा आत्राम यांनी केले. मेळाव्यास भावना चिवंडे, पायल सिडाम, शीला कुलमेथे, संगीता येरकडे, ममता मडावी, भाग्यश्री कुमरे, सुश्मिता किन्हाके, वर्षा सयाम, कुमुद आत्राम, पौर्णिमा मडकाम, मीना कुंभारे, वर्षा कुलमेथे, इशा मडावी, वर्षा कोहचाडे, वंदना चायकाटे, सोनू टेकाम, सुनीता मडावी, ज्योती पेंदोर, संजीविनी सयाम, वैशाली भालवी, अर्चना उईके यांच्यासह शेकडो आदिवासी टायगर सेना पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

#InternationalWomensDay #AdivasiTigerSena #WomenEmpowerment #ChandrapurNews #WomenAwareness #AdivasiWomen #WomenLeadership #MahilaMelava #WomenRightsIndia #ChandrapurEvent #VidarbhaNews #TribalWomen #WomenSupport #MahilaDin #SocialAwareness #chandrapurnews #chandrapurcity #chandrapur #aamchavidarbha #vidarbha

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top