Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: Fake Gold Fraud नकली सोने विक्री प्रकरणात राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
Fake Gold Fraud नकली सोने विक्री प्रकरणात राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई तीन आरोपी ताब्यात आमचा विदर्भ - दीपक शर्मा राजुरा (दि. १ एप्रिल २...
Fake Gold Fraud
नकली सोने विक्री प्रकरणात राजुरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई
तीन आरोपी ताब्यात
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. १ एप्रिल २०२५) -
        राजुरा शहरात नकली सोने विक्री करून फसवणूक करणाऱ्या टोळीवर गुन्हे प्रकटीकरण शाखेने धडक कारवाई केली. फिर्यादी प्रशांत बंडुजी माणुसमारे (वय ४२, रा. जवाहरनगर वार्ड, राजुरा) यांना तीन अनोळखी इसमांनी नकली सोने असली सोने असल्याचे सांगून पाच लाख रुपयांची फसवणूक केली. या तक्रारीवरून राजुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजुरा पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करून आरोपींचा शोध घेतला. यात भानुदास बाबुराव बंजारा (वय ४०, रा. वसरनी, ता. नांदेड), भगवान सदाशिव कांबळे (वय ५५, रा. वडगाव रोड, मुलकी, ता. यवतमाळ) आणि मतीन अमीर शेख (वय ५९, रा. सावरगड, ता. यवतमाळ) यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी आरोपींकडून ५ लाख रुपये रोख, १० हजार  रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल आणि फिर्यादीकडून घेतलेले नकली सोने किंमत अंदाजे १,००० रुपये असा एकूण ५ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. (police station rajura)


        सदरची कारवाई परी. सहायक पोलीस अधीक्षक तथा ठाणे प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे प्रभारी अधिकारी सपोनी रमेश नन्नावरे, सफौ किशोर तुमराम, पोहवा अनुप डांगे, पो.अं. योगेश पिदुरकर, महेश बोलगोडवार, शरद राठोड आणि आकाश जाधव यांनी केली. राजुरा पोलिसांनी नागरिकांना नकली सोने विक्री करणाऱ्या फसवणूकदारांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, अशा प्रकारच्या प्रकरणांबाबत तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याची विनंती केली आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top