Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author
Title: रेतीचोरीचा रस्ता बंद!
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
रेतीचोरीचा रस्ता बंद! तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई माफियांना मोठा झटका file image आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) ...
रेतीचोरीचा रस्ता बंद!
तहसीलदारांची धडाकेबाज कारवाई
माफियांना मोठा झटका
file image
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) -
        भद्रावती तालुक्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या अवैध रेती तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने निर्णायक पावले उचलली आहेत. तालुक्याचे तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वाखाली मागील तीन महिन्यांत 27 वाहने जप्त करण्यात आली असून त्यापैकी 21 वाहन मालकांकडून तब्बल 27 लाख 13 हजार 700 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित 6 वाहनधारकांवर दंड वसुलीची प्रक्रिया सुरु आहे. या कारवायांमध्ये हायवा ट्रक, ट्रॅक्टर यासारख्या अवजड वाहनांचा समावेश असून हे वाहनधारक रात्रीच्या वेळी गुप्त मार्गांनी पिपरी, गोनाड, कोंढा नाला, बिजोनी, पारोधी, उंबर घाट आणि इतर नाल्यांतून अवैध रेती वाहतूक करत होते. या अवजड वाहनांमुळे रस्त्यांची मोठी हानी झाली असून नागरिकांच्या रात्रीच्या विश्रांतीतही अडथळा निर्माण झाला होता. महसूल विभागाच्या कारवाईमुळे रेती तस्करीसाठी वापरले जाणारे आधुनिक तंत्रज्ञान निष्प्रभ ठरले आहे. या धडक कारवायांमुळे रेती माफियांमध्ये भीतीचं वातावरण पसरले असून नागरिकांमधून तहसीलदार भांडारकर यांचं कौतुक होत आहे. "अशा कडक कारवायांमुळेच प्रशासनावर विश्वास वाढतो," अशी प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे.

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top