Aamacha Vidarbha Aamacha Vidarbha Author आमचा विदर्भ न्यूजचे संस्थापक संपादक दीपक शर्मा हे २००८ पासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विविध दैनिके आणि वृत्त माध्यमांमध्ये काम करताना सामाजिक, शैक्षणिक, कामगार, ग्रामीण आणि जनसामान्यांच्या प्रश्नांवर सातत्याने लेखणी चालविली आहे. वर्ष २०१५ पासून त्यांनी डिजिटल पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवान, तटस्थ आणि जनहिताच्या बातम्या जनतेपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. सामाजिक माध्यमे आणि ऑनलाइन न्यूज प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविले आहेत. त्यांच्या पत्रकारितेचा केंद्रबिंदू नेहमीच सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील समस्या राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, सामाजिक न्याय आणि प्रशासनातील त्रुटींवर त्यांनी सातत्याने वृत्तांकन केले आहे. पत्रकारिता ही केवळ बातमी देण्याचे माध्यम नसून समाजातील सत्य परिस्थिती लोकांसमोर आणण्याची जबाबदारी आहे, या भूमिकेतून त्यांचे कार्य अविरत सुरू आहे. निष्पक्ष, जनजागृतीपर आणि समाजाभिमुख पत्रकारितेमुळे त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
Title: "विजेच्या संकटावर मनसेचा प्रकाश''
Author: Aamacha Vidarbha
Rating 5 of 5 Des:
"विजेच्या संकटावर मनसेचा प्रकाश'' महाकाली कॉलरीत ट्रान्सफॉर्मर बसवून दिलासा आमचा विदर्भ - दीपक शर्मा चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल...
"विजेच्या संकटावर मनसेचा प्रकाश''
महाकाली कॉलरीत ट्रान्सफॉर्मर बसवून दिलासा
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
चंद्रपूर (दिनांक 20 एप्रिल 2025) -
        महाकाली कॉलरी परिसरातील प्रकाश नगर आणि कपिल चौक येथे वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले होते. विजेच्या कमजोर आणि खाली लोंबकळणाऱ्या तारांमुळे जीवितहानीचीही शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर मनसेचे रुग्णमित्र कृष्णा गुप्ता, जिल्हा सचिव किशोर मडगुलवार आणि मनविसेचे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या मुख्य अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात, या भागातील नागरिक, विद्यार्थी, व्यापारी यांना होणाऱ्या त्रासाबद्दल चिंता व्यक्त केली गेली. विशेषतः घरांवरून गेलेल्या विजेच्या तारांमुळे लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिक धोक्याच्या छायेत होते.

        निवेदनाचे गांभीर्य ओळखून महावितरणचे मुख्य अभियंता यांनी तात्काळ संबंधित कर्मचार्यांना महाकाली कॉलरी, प्रकाश नगर आणि परिसरातील वीज कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले. काही दिवसांतच काम पूर्ण करण्यात येणार असून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणीही शिष्टमंडळाने ठेवली, जेणेकरून वारंवार होणारे वीज खंडित होणे थांबेल आणि जनजीवन सुरळीत राहील. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात मनसे जिल्हा उपाध्यक्ष कुलदिप चंदनखेडे, रूग्ण मित्र क्रिष्णा गुप्ता, मनविसे तालुका उपाध्यक्ष प्रविण शेवते, शंकर भडके, प्रशांत रामटेके यांच्यासह अनेक मनसैनिक उपस्थित होते.

About Author

Advertisement

टिप्पणी पोस्ट करा

Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.

 
Top