गांजा विक्री प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
आमचा विदर्भ - दीपक शर्मा
राजुरा (दि. 03 एप्रिल 2025) -
स्थानिक सोनिया नगर येथे गांजाची विक्री करणाऱ्या आरोपीला राजुरा पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत 530 ग्रॅम गांजा व दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची कारवाई 2 एप्रिल रोजी करण्यात आली असून, अरुण रामराव कुमरे (वय 66 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी आपल्या राहत्या घरी गांजा विक्री करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्याच्या घरी छापा टाकला असता, ड्रेसिंग टेबलच्या ड्रॉवरमध्ये पिवळ्या रंगाच्या प्लास्टिक पिशवीत ठेवलेला 530 ग्रॅम गांजा सदृश्य वस्तू आढळून आली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध अपराध क्रमांक 156/2025 अन्वये एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या कलम 8(क), 20(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (police station rajura)
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच परिविक्षाधीन प्रभारी अधिकारी अनिकेत हिरडे (IPS), पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पवार, पोलीस उपनिरीक्षक भिष्मराज सोरते, गोविंद चाटे, किशोर तुमराम, अविनाश बांबोळे, महेश बोलगोडवार, शरद राठोड, भूषण यांनी केली. पोलिसांच्या या यशस्वी कारवाईमुळे स्थानिक परिसरात अवैध पदार्थ विक्री करणाऱ्यांना चांगलाच धडा मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.