अवैध हातभट्टी मोहा दारू अड्ड्यावर छापा
पोलिसांच्या धडक कारवाईत ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
आमचा विदर्भ - अनंता गोखरे
चंद्रपूर (दि. 21 एप्रिल 2025) -
दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा वरवट येथील शेतशिवारात असलेल्या ढोडा नाल्याजवळ अवैधरित्या हातभट्टी मोहा दारू बनविल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आज छापा टाकून मोठ्या प्रमाणावर दारू आणि साहित्य जप्त केले.
छाप्यादरम्यान पोलिसांना 02 लोखंडी ड्रम सुमारे 300 लिटर गरम मोहा सडवा, किंमत 32 हजार, 2 प्लास्टिक ड्रम मोहा सडवा सहित, किंमत 30 हजार 800 रुपये, 2 प्लास्टिक डबक्यांमध्ये गावठी मोहा दारू (40 लीटर) किंमत 6,200 रुपये, 2 प्लास्टिक ड्रम 800 रुपये, 2 जर्मन घमेले 2 हजार रुपये तसेच अन्य साहित्यात पीपे, स्टील बकेट, गाळणी, प्लास्टिक पाईप तुकडे अंदाजे किंमत 300 रुपये असा एकूण 72 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. या प्रकरणात पोलिसांनी धनराज खोब्रागडे, दिनेश रायपुरे, प्रतिमा रायपुरे सर्व रा. वरवट यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक संदीप इकडे पाटील यांच्या नेतृत्वात पो. हवा. स्वप्निल बुरीले, गुरुदेव मजोके, व पोलीस पाटील श्रीमती ललिता रायपुरे (वरवट) यांनी संयुक्तपणे केली.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.