पहलगाममधील रक्तरंजित घटनेनंतर बल्लारपूरात आक्रोशाचा सूर
आमचा विदर्भ - राजेश अरोरा / अनिल पांडेय
बल्लारपुर (दि. 25 एप्रिल 2025) -
जम्मू-कश्मीरच्या पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या 28 निष्पाप पर्यटकांच्या निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानवी कृत्याचा निषेध करण्यासाठी बल्लारपूर शहरातील नगर परिषद चौकात भाजपकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
या हल्ल्यात पाकिस्तानी अतिरेक्यांनी धर्म विचारून निष्पाप नागरिकांवर गोळ्या झाडल्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या डोळ्यासमोरच मृत्यू घडविला. याच पार्श्वभूमीवर 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6 वाजता, भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नवीन शहराध्यक्ष अॅड. रणंजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली हे शांततापूर्ण आंदोलन झाले.
या निदर्शना दरम्यान उपस्थित कार्यकर्त्यांनी "पाकिस्तान मुर्दाबाद" च्या घोषणा दिल्या. मृतांना श्रद्धांजली अर्पण करत 2 मिनिटांचे मौन पाळण्यात आले. यावेळी काशीनाथ सिंह, शिवचंद्र द्विवेदी, वैशाली जोशी, मनीष पांडे, बबलू गुप्ता, मोहित डांगोरे, अॅड. शाह, सचिन उमरे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. भाजपने या अमानुष घटनेचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवत केंद्र शासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा
Thanks for your response, We will reply you soon, You haven't followed Aamcha Vidarbha yet, you follow Aamcha Vidarbha now.